Reserve Bank of India (RBI) ने जाहीर केलेल्या अधिकृत (holidays) कॅलेंडरनुसार मार्च 2026 महिन्यात विविध सण-उत्सवांमुळे देशातील बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत. या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये समान नसून स्थानिक सण आणि प्रादेशिक परंपरांनुसार त्यात बदल होणार आहेत. काही दिवशी देशभर बँका बंद राहतील, तर काही ठिकाणीच कामकाज थांबणार आहे.

महिन्याच्या सुरुवातीलाच 1 मार्च रोजी रविवार (holidays) असल्याने देशभरातील बँकांना नियमित साप्ताहिक सुट्टी असेल. त्यानंतर 2 मार्चला होलिका दहन आणि 3 मार्चला धुलिवंदनामुळे अनेक राज्यांमध्ये व्यवहार बंद राहतील. 4 मार्चला होळीच्या दुसऱ्या दिवशी नवी दिल्ली, चंदीगड, कानपूर आणि अहमदाबादसह काही शहरांमध्ये बँका बंद असतील. 13 मार्चला मिझोरामची पारंपरिक सण ‘चपचार कुट’ निमित्त ऐझवालमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मध्य महिन्यातही विविध धार्मिक सणांमुळे कामकाजावर (holidays) परिणाम होणार आहे. 17 मार्चला शब-ए-कद्र निमित्त काही राज्यांमध्ये बँक सेवा उपलब्ध राहणार नाही. 19 मार्चला गुढीपाडवा, तेलगू नववर्ष आणि पहिली नवरात्री यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील. 20 मार्चला ईद-उल-फित्र (रमजान) आणि जुमात-उल-विदा निमित्त जम्मू, श्रीनगर आणि केरळमध्ये सुट्टी असेल, तर 21 मार्चला रमजान ईद निमित्त देशभर सुट्टी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.महिन्याच्या उत्तरार्धात 26 मार्चला रामनवमीमुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. 27 मार्चला रामनवमीच्या उत्तरार्धात भोपाळ, पाटणा आणि भुवनेश्वर येथे कामकाज ठप्प राहणार आहे. 31 मार्चला महावीर जयंतीनिमित्त नवी दिल्ली, मुंबई (बेलापूर), जयपूर आणि कानपूर येथे बँकांना सुट्टी असेल.
आरबीआयच्या (holidays) नियमानुसार सर्व सुट्ट्या प्रत्येक राज्यात लागू होत नाहीत. स्थानिक सणांनुसार सुट्टीची अंमलबजावणी केली जाते. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टअंतर्गत घोषित सुट्ट्यांमध्ये चेक क्लिअरिंग, ओव्हर-द-काउंटर व्यवहार, रोख रक्कम भरणे किंवा काढणे यांसारखी कामे होणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी महत्त्वाचे आर्थिक व्यवहार वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शाखा बंद असल्या तरी डिजिटल बँकिंग सेवा सुरळीत सुरू राहतील. नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करता येतील. एटीएममधून रोख रक्कम काढणे तसेच सीडीएमद्वारे रोख जमा करणे शक्य राहील. कोणत्याही बदलांसाठी संबंधित बँकांकडून येणाऱ्या अधिकृत सूचना आणि संदेशांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा :
सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
पहिलं Long Distance Relationship आता Silent Love! काय आहे हा नवा ट्रेंड ?
‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच…