आफ्रिका खंडातील गॅम्बिया हा आकाराने लहान पण नैसर्गिक (beautiful country) सौंदर्याने नटलेला देश सध्या एका वेगळ्याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय चर्चेत आला आहे. अटलांटिक महासागरालगत वसलेला हा देश आपल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांमुळे आणि उबदार हवामानामुळे अनेक वर्षांपासून युरोपियन पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. पर्यटन हा येथील अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा मानला जातो.

मात्र गेल्या काही वर्षांत येथे (beautiful country) वाढलेल्या तथाकथित ‘रोमॅन्स टुरिझम’मुळे परिस्थितीवर चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः काही युरोपियन देशांमधून, विशेषत: युनायटेड किंगडम आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांतून मध्यमवयीन आणि ज्येष्ठ महिला गॅम्बियामध्ये सुट्टीसाठी येतात. स्थानिक तरुणांशी मैत्री करून त्यांना आर्थिक मदत, महागड्या भेटवस्तू किंवा इतर स्वरूपातील सहाय्य दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गरिबी आणि मर्यादित रोजगारसंधी यामुळे काही तरुण या संबंधांकडे आर्थिक आधार म्हणून पाहतात, असे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर 2022 मध्ये गॅम्बियाच्या पर्यटन (beautiful country) अधिकाऱ्यांनी ब्रिटिश प्रशासनाशी संवाद साधत देशाची प्रतिमा ‘सामान्य पर्यटनस्थळ’ म्हणूनच राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. स्थानिक पातळीवरही या विषयावर मतमतांतरे आहेत. काहीजण यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते असे मानतात, तर सामाजिक संघटना यामुळे निर्माण होणाऱ्या नैतिक, सामाजिक आणि मानवी हक्कांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधतात.
गॅम्बिया हा (beautiful country) केवळ वादांचा देश नसून त्याची संस्कृती, संगीत, नदीकिनारी वसलेली गावे आणि निसर्गसौंदर्य हेही पर्यटकांना आकर्षित करणारे घटक आहेत. मात्र पर्यटनाच्या बदलत्या स्वरूपामुळे या छोट्या देशासमोर सामाजिक संतुलन राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!