पश्चिम आशियात तणावाची परिस्थिती अधिक तीव्र होत असताना इराण, इस्राईल आणि (conflict) अमेरिका यांच्यातील संघर्षावर जागतिक समुदायाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे युद्ध तीन देशांपुरतेच मर्यादित राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, सध्याच्या घडामोडींवरून इतर देश थेट युद्धात सहभागी होतील असे संकेत दिसत नाहीत.

पटवर्धन यांनी स्पष्ट केले की युनायटेड (conflict) किंग्डमने अमेरिकेला काही प्रमाणात लॉजिस्टिक मदत देण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यांनी थेट युद्धात उडी घेतलेली नाही. ब्रिटनने आपल्या एअरबेसचा वापर करण्यास परवानगी दिली असली, तरी इतर प्रमुख देशांनी उघडपणे कोणत्याही बाजूने उभे राहण्याची भूमिका घेतलेली नाही. मात्र, मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर इराणकडून लक्ष्य साधले जात असल्याचे दिसून येत आहे. दुबईतील महत्त्वाच्या भागांनाही धक्का बसल्याच्या बातम्या समोर आल्या असून त्यानंतर इराणने संबंधित घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचेही सांगितले जाते.

या संघर्षाचा सर्वाधिक परिणाम हवाई वाहतुकीवर झाला आहे. दररोज (conflict) हजारो आंतरराष्ट्रीय उड्डाणे या मार्गाने होत असतात. त्यामुळे हवाई मार्ग बंद झाल्यास अमेरिका आणि युरोपला आर्थिक फटका बसू शकतो. पटवर्धन यांच्या मते, युद्धाचा विस्तार टाळण्याची भूमिका दोन्ही बाजूंनी घेतल्याचे दिसते. इराणने अमेरिकन किंवा ब्रिटिश सैन्य ज्या ठिकाणी तैनात आहे, त्या तळांनाच लक्ष्य केले असून व्यापक युद्ध छेडण्याचे संकेत अद्याप दिसत नाहीत.

युद्धाच्या खर्चाबाबत (conflict) बोलताना त्यांनी सांगितले की, इराणकडे हजारो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे असल्याचा अंदाज आहे. एका ड्रोनला पाडण्यासाठी अनेक इंटरसेप्टर मिसाईल्स डागाव्या लागतात. प्रत्येक इंटरसेप्टर तयार करण्यासाठी मोठा आर्थिक खर्च आणि वेळ लागतो. त्यामुळे दीर्घकालीन युद्ध सर्वच पक्षांसाठी अत्यंत खर्चिक ठरू शकते. क्षेपणास्त्रांची निर्मिती ही त्वरित होणारी प्रक्रिया नसून त्यासाठी अनेक दिवस लागतात. त्यामुळे कोणत्या देशाची साठवण आधी संपते, हे पुढील घडामोडींमध्ये महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भारतानेही परिस्थितीवर बारकाईने लक्ष (conflict) ठेवले आहे. मध्यपूर्वेत राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने तिन्ही सैन्यदलांना सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळते. हवाई मार्ग असुरक्षित असल्याने आवश्यक असल्यास समुद्री मार्गाचा वापर करून बचावकार्य राबवावे लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या भारतीय नागरिकांवर थेट हल्ल्यांच्या घटना समोर आलेल्या नसल्या तरी तणाव वाढल्यास परिस्थिती बदलू शकते.

पर्यटनासाठी किंवा (conflict) अल्पकालीन वास्तव्यासाठी गेलेले अनेक भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार सुरू असल्याचे संकेत आहेत. मात्र, एकूण परिस्थिती पाहता हे युद्ध मर्यादित स्वरूपातच राहण्याची शक्यता अधिक असल्याचा दावा पटवर्धन यांनी केला आहे. इराणला संघर्षाची व्याप्ती वाढवायची नसून तो ठरावीक लष्करी उद्दिष्टांपुरताच ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *