माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना समोर आली आहे. (Abused)ज्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरात खळबळ उडालीय. एका 38 वर्षीय कीर्तनकाराने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तब्बल पाच वर्षे गंभीर लैंगिक शोषण केले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून संतप्त ग्रामस्थांकडून कडक कारवाईची मागणी होत आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील पारने तालुक्यातील ढवळीपूर येथे वारकरी संप्रदायाला बट्टा लावणारी ही एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली आहे.

श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था चालवणारा अध्यक्ष आणि स्वतःला (Abused) महाराज म्हणवून घेणारा यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ . पीडिता आठवीत असल्यापासून, म्हणजेच २०२१ पासून हा ३८ वर्षीय नराधम तिच्यावर अनन्वित अत्याचार करत होता. आरोपी आणि पीडितेचे कुटुंब शेजारीच राहत असल्यामुळे त्यांच्यात चांगले घरोब्याचे संबंध होते. मुलीचा सख्खा भाऊ याच आरोपीच्या संस्थेमध्ये सचिव पदावर काम करतो. या ओळखीचा गैरफायदा घेत, मुलगी किंवा स्वतःच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर वारंवार बळजबरी केली.
जेव्हा या अल्पवयीन मुलीने त्याच्या या घृणास्पद कृत्याला विरोध दर्शवला, तेव्हा या बाबाने तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची थेट धमकी दिली. आपण यापूर्वीच ‘दोन हाफ मर्डर’ केले असून, याबाबत कोणाला काहीही सांगितल्यास आई-वडील आणि भावाला जिवे मारू, अशी दहशत त्याने निर्माण केली होती. कुटुंबाच्या जिवाच्या भीतीने या कोवळ्या जीवाने आपला हा शारीरिक छळ अनेक वर्षे मुकाट्याने सहन केला.अखेर रविवारी पहाटे चार वाजता पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने त्याला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोस्को आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल झाले असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
या अमानुष अत्याचाराची परिसीमा १० मार्च २०२६ रोजी गाठली गेली. या दिवशी आरोपीने पीडितेला फोनवरून स्वतःच्या घरी बोलावून घेतले. सुरुवातीला तिने जाण्यास स्पष्ट नकार दिला, परंतु त्याने पुन्हा एकदा कुटुंबाला संपवण्याची धमकी दिल्याने घाबरलेली मुलगी त्याच्या घरी पोहोचली. ‘येण्यासाठी इतका उशीर का केला?’ असा जाब विचारत या राक्षसाने तिला संगणक कक्षात कॉम्प्युटर रूम ओढत नेले. तिथे त्याने तिला बांबूच्या काठीने आणि हाताने बेदम मारहाण केली. त्याचा क्रूरपणा इथेच थांबला नाही; त्याने स्वयंपाकघरातील गॅसवर लोखंडी पक्कड तापवून या कोवळ्या मुलीला त्याचे निर्दयी चटके दिले.
या भयंकर शारीरिक यातना दिल्यानंतरही त्याने तिच्यावर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचार केला (Abused) आणि कुठेही वाच्यता केल्यास घरासकट सर्वांना जाळून मारण्याची धमकी दिली. या अमानुष मारहाणीमुळे आणि चटक्यांच्या जखमांमुळे मुलीला नीट चालणेही कठीण झाले होते. त्यानंतर १४ मार्चला तिचा भाऊ घरी परतला, तेव्हा बहिणीची ही विदारक अवस्था पाहून त्याने तिला विश्वासात घेतले. तेव्हा मावस भावांसमोर तिने आपल्यावर ओढवलेला हा पाच वर्षांचा भीषण प्रसंग उलगडला. यानंतर संतप्त भावाने तत्काळ पारनेर पोलीस ठाणे गाठून रीतसर फिर्याद नोंदवली. या घटनेमुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, या भोंदू महाराजावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज