आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मैदानात उरणार आहे. मागच्या दोन पर्वात त्याच्या नेतृत्वात मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली. यंदा जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करणार का? यासाठी टीम मॅनेजमेंटला सुरूवातीला मोठे निर्णय घेणं भाग आहे.आयपीएल 2026 स्पर्धेत जेतेपदासाठी मुंबई इंडियन्स संघ सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे.

पण मागच्या दोन पर्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी हवी तशी झाली नाही. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही पदरी निराशा पडला पडली. मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये शेवटचं जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर मागच्या पाच वर्षांपासून जेतेपदाचा दुष्काळ आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ टॉप 4 मध्ये होता. पण एलिमिनेटर फेरीतच आशा संपुष्टात आल्या. (Mumbai Indians) आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघ सज्ज झाला आहे. 2026 आयपीएल जेतेपद मिळवण्याच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. वानखेडे स्टेडियम मुंबई इंडियन्ससाठी कायम वरदान ठरलं आहे. पण टीम व्यवस्थापनापुढे एक टेन्शन आहे.
मुंबई इंडियन्सचे आघाडीच्या फलंदाजांना पर्यायच नाही. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या या सारखे तगडे फलंदाज आहे. हे खेळाडू कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद ठेवतात. तसेच दक्षिण अफ्रिकेचा फॉर्मात असलेला विकेटकीपर फलंदाज क्विंटन डीकॉकही संघात आहे. तसेच रियान रिकल्टन, कॉर्बिन बॉश आणि विल जॅक्स फॉर्मात असलेल्या खेळाडूंमुळे प्रतिस्पर्धी संघांची दाणादाण उडणार आहे. (Mumbai Indians) त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचा काही प्रश्नच येत नाही. मुंबई इंडियन्सचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात आणि धावांचा पाठलाग करण्यात कमी पडतील असं वाटत नाही.
गोलंदाजीत तर मुंबई इंडियन्सकडे हुकूमाचा एक्का आहे. जसप्रीत बुमराह असल्याने चार षटकांचा खेळ मुंबईच्या हातात आहे. त्याचबरोबर शार्दुल ठाकुर, ट्रेंट बोल्ट आणि दीपर चहर हे देखील गोलंदाजीत साथ देणार आहेत. कर्णधार हार्दिक पांड्या गोलंदाजीत योगदान देणार हे काय नव्याने सांगायला नको. इतकंच काय तर फिरकीतही मुंबईचा संघ तगडा दिसत आहे. अल्लाह गझनफर आणि मिचेल सँटनरसारखे स्टार फिरकीपटू आहेत. पर्याय म्हणून मयंक मार्केंडेय आणि रघु शर्मा आहेत.
मुंबई इंडियन्स सर्वच बाबतीत तगडी दिसत आहे. पण असं असताना प्लेइंग 11 निवडणं आव्हानात्मक असणार आहे. कारण प्लेइंग 11 मध्ये 4 विदेशी खेळाडू असणार आहे. आयपीएल नियमानुसार, जास्तीत जास्त 4 विदेशी खेळाडूंची निवड प्लेइंग 11 मध्ये करता येईल. मुंबईकडे शेरफेन रूदरफोर्ड, गजनफर, कॉर्बिन बॉश, मिचेल सँटनर, रियान रिकल्टन, ट्रेंड बोल्ड, विल जॅक्स आणि क्विंटन डिकॉक आहे. (Mumbai Indians) यापैकी कोणत्या चार खेळाडूंची निवड करायची असा प्रश्न असणार आहे. शेरफेन रदरफोर्ड, कॉर्बिन बॉश, रियान रिकलटन, विल जॅक्स आणि क्विंटन डी कॉक हे फॉर्मात आहेत. यापैकी कशी निवड करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज