आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार सुरु असताना न्यूझीलंड क्रिकेट टीम बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभयसंघात एकूण 2 मालिकांमध्ये 6 सामने खेळवण्यात येणार आहेत.

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता काही आठवडे द्विपक्षीय मालिकांचा थरार पाहायला मिळत आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अवघ्या काही दिवसांपूर्वी बांगलादेशने मायदेशात पाकिस्तानचा एकदिवसीय मालिकेत धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला. आता 28 मार्चपासून आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. (cricket) अशात मोठी अपडेट समोर आली आहे. साधारणपणे आयीपएल स्पर्धेदरम्यान आंतरराष्ट्रीय मालिकांचं आयोजन केलं जात नाही. मात्र या 19 व्या हंगामादरम्यान 2 संघ भिडणार आहेत. या 2 संघांमध्ये 2 मालिका खेळवण्यात येणार आहेत. याबाबत आपण जाणून घेऊयात.

बांगलादेश आणि न्यूझीलंड आयपीएलच्या 19 व्या हंगामादरम्यान एकमेकांविरुद्ध 2 मालिकांमध्ये एकूण 6 सामने खेळणार आहे. या दोन्ही मालिकांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. न्यूझीलंड क्रिकेट आणि आयसीसीकडून (cricket) याबाबतची माहिती देण्यात आल आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीम या मालिकांसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंडच्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात ही वनडे सीरिजने होणार आहे. वनडे सीरिजचा थरार 17 ते 23 एप्रिल दरम्यान रंगणार आहे. तर 27 एप्रिल ते 2 मे दरम्यान टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे.

बांगलादेशच्या खेळाडूंना यंदा 19 व्या मोसमासाठी प्रवेश नाहीय. बांगलादेशमधील वाढत्या संघर्षानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे बांगलादेशचा प्रमुख संघ मायदेशातील मालिकेसाठी सज्ज असणार आहे. (cricket) तर न्यूझीलंडची बी टीम बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना होऊ शकते.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 17 एप्रिल, मीरपूर
दुसरा सामना, 20 एप्रिल, मीरपूर
तिसरा सामना, 23 एप्रिल, चटगाव

न्यूझीलंडचा बांगलादेश दौरा मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड बांगलादेश दौऱ्यासाठी वनडे सीरिजच्या 4 दिवसांआधी पोहचणार आहे. किवी 13 एप्रिलला बांगलादेशमध्ये पोहचणार आहेत.

टी 20i मालिकेचा थरार
पहिला सामना, 27 एप्रिल, चटगाव
दुसरा सामना, 29 एप्रिल, चटगाव
तिसरा सामना, 2 मे, ढाका

दरम्यान टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंड क्रिकेट टीम मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i मालिका खेळत आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने होणार आहेत. ही मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिकेत विजयी सुरुवात केली. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक करत बरोबरी साधली. आता तिसऱ्या सामन्यात कोण मैदाना मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *