Oplus_131072

अल्पवयीन मुलीला बेल्टने मारहाण (arrested)करत अत्याचार करणाऱ्या संशयिताला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. राज विजय जगताप वय २०, रा. यादवनगर, डवरी वसाहत असे संशयिताचे नाव आहे. मागील दोन वर्षांपासून या मुलीला भीती घालून तो शारीरिक संबंध ठेवत असल्याची माहिती समोर आली

पोलिसांकडून मिळालेली माहिती (arrested)अशी, संशयित जगताप याने चौदा वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवले होते. ऑक्टोबर २०२४ पासून तो मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता. बेल्टने मारहाण करत त्याने मुलीवर दहशत निर्माण केली होती.

तसेच, याची कोणाला माहिती (arrested) दिल्यास पुन्हा मारहाण करण्याची धमकी तो देत होता. अलीकडे मुलीने त्याला भेटणे बंद केल्याने पुन्हा तिला मारहाण केली. यामुळे तिच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताला अटक करण्यात आली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *