भारतासाठी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे.(geological) भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्था ने माहिती दिली आहे की ओडिशा राज्यात नव्या सोन्याच्या खाणींचा शोध लागला आहे. देवगड (आदासा-रामपल्ली), सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट या भागांत सोनं सापडलं आहे. तर मयूरभंज, मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध जिल्ह्यांत अजूनही शोधमोहीम सुरू आहे. मार्च 2025 मध्ये खाणमंत्री बिभूती भूषण जेना यांनी विधानसभेत याची घोषणा केली होती.
अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नसली तरी तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या साठ्यांमध्ये 10 ते 20 मेट्रिक टन सोनं असू शकतं. तुलना केली तर हा आकडा भारताच्या वार्षिक आयातीपेक्षा खूपच कमी आहे, कारण 2024-25 मध्ये भारताने 700-800 मेट्रिक टन सोने आयात केलं होतं. (geological) तरीदेखील, हा शोध देशांतर्गत उत्पादनात वाढ करणार आहे. 2020 पर्यंत भारताचं वार्षिक उत्पादन फक्त 1.6 टन होतं, त्यामुळे ओडिशातील या नव्या खाणी खाणकाम क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहेत. आयातीवरील अवलंबित्व पूर्ण कमी होणार नसले तरी, भारत सोन्याच्या बाबतीत आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल टाकत आहे.

आर्थिक फायदा आणि रोजगार ओडिशा सरकार, OMC (ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन) आणि GSI या खाणींचं व्यावसायिकीकरण करण्याच्या तयारीत आहेत.(geological) देवगडमधील पहिला ब्लॉक लिलावासाठी सज्ज केला जात आहे.
यातून राज्याच्या महसुलात वाढ होईलच, पण स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधा, वाहतूक, सेवा क्षेत्र आणि रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील. त्यामुळे या खाणी प्रादेशिक विकासालाही मोठी गती देतील.

ओडिशा – खनिज संपत्तीचं महाकेंद्र ओडिशा आधीपासूनच खनिज संपत्तीनं समृद्ध आहे. भारतातील क्रोमाईटचे 96%, बॉक्साईटचे 52% आणि लोखंडी खनिजाचे 33% साठे इथे आहेत. आता सोन्याच्या नव्या खाणी सापडल्यामुळे, ओडिशा खनिज संपत्तीच्या नकाशावर अधिक महत्वाचं ठिकाण ठरणार आहे. यामुळे केवळ राज्य नाही तर देशाची अर्थव्यवस्था, उद्योग, निर्यात आणि रोजगार या सर्वच क्षेत्रांना चालना मिळणार आहे. ओडिशा हळूहळू भारताच्या आर्थिक विकासाचा नवा केंद्रबिंदू बनू शकतो.
हेही वाचा :
Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी
मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय; ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा
मृत्यूनंतरही यातना, अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून मृतदेह नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ Video