भारताची आघाडीची टेलिकॉम कंपनी Reliance Jio आपल्या ग्राहकांसाठी परवडणारे आणि दीर्घकालीन वैधता देणारे प्लॅन्स सतत सादर करत असते. अशाच एका खास रिचार्ज प्लॅनमुळे सध्या जिओ पुन्हा चर्चेत आले आहे. अवघ्या 1,234 रुपयांत तब्बल 336 दिवसांची वैधता देणारा हा प्लॅन अनेक वापरकर्त्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 0.5GB हाय-स्पीड डेटा मिळतो, ज्यामुळे पूर्ण वैधतेदरम्यान एकूण 168GB डेटा उपलब्ध होतो. याशिवाय, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आणि प्रत्येक 28 दिवसांसाठी 300 SMS दिले जातात. डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट स्पीड 64kbps पर्यंत कमी होतो, (recharge) त्यामुळे हलक्याफुलक्या वापरासाठीच हा प्लॅन अधिक योग्य मानला जातो.
या प्लॅनची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याची पात्रता. हा रिचार्ज प्लॅन सर्वसामान्य स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी नसून, विशेषतः जिओच्या Jio Bharat Phone वापरणाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. (recharge) त्यामुळे ज्यांच्याकडे हा फोन आहे आणि ज्यांना दीर्घ वैधता हवी आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.
याशिवाय, या प्लॅनसोबत ग्राहकांना JioSaavn आणि JioTV यांसारख्या डिजिटल सेवांचा मोफत ॲक्सेस देखील मिळतो. त्यामुळे मनोरंजनाची सोयही यातून होते.दरम्यान, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या प्रतिस्पर्धी कंपन्यांकडे सध्या इतक्या कमी किमतीत 336 दिवसांची वैधता देणारा कोणताही प्लॅन उपलब्ध नाही. (recharge) त्यामुळे कमी खर्चात जास्त वैधता हवी असलेल्या ग्राहकांसाठी जिओचा हा प्लॅन एक वेगळा पर्याय ठरत आहे.
हेही वाचा :
भोंदू अशोक खरातकडून मंदिराच्या परिसरात नरबळी?
राजकारण वंगाळ, सुनेत्राकाकींनी काळजी घ्यावी – रोहित पवार
इराणचा पाकिस्तानला मोठा धक्का; होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजाला बंदी