राज्यासह देशातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत (witnessing) असून नागरिकांसह शेतकरीही संभ्रमात सापडले आहेत. एका बाजूला कडक उन्हाची तीव्रता जाणवत असताना दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावत परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची केली आहे. मागील आठवडाभरापासून महाराष्ट्रातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीची नोंद झाली आहे.

भारतीय हवामान (witnessing) विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. विशेषतः लातूर, नांदेड, बीड, सोलापूर, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दुसरीकडे कोकण पट्ट्यात मात्र पूर्णपणे वेगळी स्थिती पाहायला मिळत आहे. (witnessing) मुंबई, रायगड आणि रत्नागिरी येथे उष्ण व दमट हवामानाचा प्रभाव वाढला असून उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः काढणीस तयार असलेली पिके पावसामुळे आडवी पडली असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून नुकसान भरपाईबाबतही चर्चा सुरू आहे.
सांगली आणि मिरज (witnessing) परिसरात सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभर कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी बदलत्या हवामानामुळे आरोग्य आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. एकूणच, मार्च महिन्याच्या अखेरीसही हवामान स्थिर होत नसल्याने पुढील काही दिवस परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
ठाणे हादरलं, वर्गणीच्या वादातून डायरेक्ट एकाच्या डोक्यात चॉपरने वार