‘महाकुंभ व्हायरल गर्ल’ म्हणून ओळख (centre of controversy) मिळवलेली मोनालिसा भोसले पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. अलीकडेच तिने केरळमध्ये तिचा मुस्लिम प्रियकर फहमान खान याच्यासोबत हिंदू पद्धतीने विवाह केला. या अचानक झालेल्या लग्नामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली असून, काहींकडून या नात्यावर ‘लव्ह जिहाद’चे आरोप करण्यात येत आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर मोनालिसाने आता गंभीर आरोप करत आणखी एक मोठा खुलासा केला आहे. कोची येथे आयोजित पत्रकार परिषदेत ती आपल्या पतीसोबत माध्यमांसमोर आली आणि भावुक होत तिने सांगितले की, लग्नानंतर त्यांना सतत धमक्या दिल्या जात आहेत आणि मानसिक दबावही टाकला जात आहे. या वेळी तिने दिग्दर्शक मनोज मिश्रा यांच्यावर गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले.

मोनालिसाच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली (centre of controversy) मनोज मिश्रा यांनी तिच्याशी अयोग्य वर्तन केले. त्यांनी अनेक वेळा अनुचित स्पर्श केल्याचा आरोप करत ती म्हणाली की, या सर्व गोष्टी तिने बराच काळ सहन केल्या. तिने असेही सांगितले की, या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतरही तिला अपेक्षित साथ मिळाली नाही, ज्यामुळे ती पूर्णपणे एकटी पडली. तिने पुढे आरोप केला की, संबंधित दिग्दर्शक तरुणींना चित्रपटात संधी देण्याचे आमिष दाखवून त्यांचे शोषण करतात. या विधानामुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही, यावर स्पष्टीकरण देताना मोनालिसाने सांगितले की, तिने तक्रार करण्याचा विचार केला होता; मात्र कुटुंबीयांच्या दबावामुळे ती मागे हटली.
याचवेळी तिने सरकारकडे संरक्षण (centre of controversy) आणि न्यायाची मागणी केली आहे. तसेच, मनोज मिश्रा तिच्या पतीविषयी चुकीची माहिती पसरवत असून त्याला दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप तिने केला. ११ मार्च रोजी केरळमध्ये पार पडलेल्या या विवाहानंतर मोनालिसा आणि फहमान यांना सतत धमक्या येत असल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, चित्रपटसृष्टीतही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा :
ठाणे हादरलं, वर्गणीच्या वादातून डायरेक्ट एकाच्या डोक्यात चॉपरने वार