१ एप्रिल २०२६ पासून देशभरात नवीन कामगार कायदा लागू होणार(overtime) असून यामुळे नोकरदार वर्गाच्या आयुष्यात मोठे बदल घडणार आहेत. या नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांचा पगार, कामाचे तास आणि ओव्हरटाइमच्या गणितात आमूलाग्र बदल पाहायला मिळतील. नव्या कायद्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार असल्याने त्यांच्या हातात येणारा प्रत्यक्ष पगार कमी होऊ शकतो, मात्र भविष्य निर्वाह निधी (overtime) आणि ग्रॅच्युटीमध्ये मोठी वाढ होऊन निवृत्तीनंतरचा काळ अधिक सुरक्षित होणार आहे.

कामाच्या तासांबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, (overtime) कंपन्यांना आता १२ तासांपर्यंत कामाची वेळ वाढवता येणार आहे, परंतु अशा स्थितीत आठवड्यातून तीन दिवस सुट्टी देणे बंधनकारक असेल. ओव्हरटाइमच्या नियमातही कामगारांना दिलासा देण्यात आला आहे; जर एखाद्या कर्मचाऱ्याने विहित वेळेपेक्षा १५ मिनिटे जरी जास्त काम केले, तर त्याला अर्ध्या तासाचा ओव्हरटाइम द्यावा लागणार आहे. या ऐतिहासिक बदलांमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील कार्यसंस्कृती बदलणार असून, खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांतील लाखो कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर याचा थेट परिणाम होणार आहे. सरकारचा हा निर्णय कामगारांचे सामाजिक सुरक्षा कवच मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल मानले जात आहे.

हेही वाचा :

फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद

घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार

देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *