आजच्या काळात तंदुरुस्त राहण्यासाठी अनेकजण जंक फूड (careful)आणि मद्यपानापासून दूर राहत निरोगी जीवनशैलीचा अवलंब करताना दिसतात. मात्र, अशा आहाराच्या सवयी सुधारूनही आपण नकळत काही अशा चुका करतो, ज्यामुळे शरीराची पेशीय पातळीवर हानी होते. पांढरे केस किंवा सुरकुत्या एवढीच म्हातारपणाची लक्षणे नसून, तुमच्या रोजच्या काही कृती हे वय झपाट्याने वाढवत आहेत.दिवसभरात आठ तासांहून अधिक काळ शारीरिक हालचाल न करता एकाच जागी बसून राहणे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. ‘यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, १३ विविध संशोधनांमधून आणि दहा लाखांहून अधिक व्यक्तींच्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे की, अशा निष्क्रिय जीवनशैलीमुळे मृत्यूचा धोका लठ्ठपणा किंवा धूम्रपानाइतकाच वाढतो. हा धोका टाळण्यासाठी दररोज ६० ते ७५ मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे. एकाच जागी खिळून राहिल्याने शरीराची चयापचय प्रक्रिया मंद पडते आणि पेशींमधील डीएनएचे टेलोमेअर्स वेगाने आकुंचन पावतात, ज्यामुळे म्हातारपण लवकर येते.

याव्यतिरिक्त, अपूर्ण झोप घेणे हे देखील तितकेच नुकसानकारक आहे.(careful) केवळ पाच तास झोपून शरीर निरोगी राहील हा विचार पूर्णपणे चुकीचा असून ‘नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूट’ च्या मते, वयानुसार आवश्यक असलेली झोप न घेतल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. झोपेतच आपले शरीर स्वतःला दुरुस्त करते, ऊर्जेची पातळी वाढवते आणि हार्मोन्सचे संतुलन राखते. अपुऱ्या झोपेमुळे रोगप्रतिकारशक्ती आणि स्मरणशक्ती कमकुवत होते. तसेच, दीर्घकालीन ताणतणावामुळे शरीरात कॉर्टिसोल नावाच्या संप्रेरकाची पातळी वाढते, ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात आणि हृदय, पचनसंस्था व मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
मोबाईल आणि लॅपटॉपसारख्या उपकरणांसमोर तासनतास (careful)घालवल्याने त्यातून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि रात्रीच्या झोपेचे चक्र बिघडते, ज्यामुळे अकाली वृद्धत्व येते. यासोबतच, शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास निर्जलीकरण होऊन त्वचा निस्तेज दिसू लागते. विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकण्यासाठी आणि अंतर्गत कार्ये सुरळीत चालण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण राखणे अत्यंत आवश्यक आहे. आहारातील अतिरिक्त साखर आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे ‘ग्लायकेशन’ प्रक्रिया वेगवान होते, परिणामी त्वचेचा लवचिकपणा नाहीसा होऊन चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसू लागतात.
वाढत्या वयानुसार शरीरातील स्नायू कमकुवत होऊ लागतात. जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा पुरेसा व्यायाम टाळलात, तर स्नायूंची झीज होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते आणि शरीरात सुस्ती तसेच अशक्तपणा जाणवू लागतो. या सर्व शारीरिक सवयींसोबतच एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे सामाजिक संबंधांपासून दूर राहणे. विविध अभ्यासांमधून असे स्पष्ट झाले आहे की, समाजात न मिसळता सतत एकाकी राहिल्यामुळे किंवा सामाजिक अलिप्ततेमुळे माणसाचा अकाली मृत्यू होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
हेही वाचा :
गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा
या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?
चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक