१ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत असून यंदाही सर्वसामान्यांच्या (financial year) दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. इंधनाच्या किमतींपासून ते आयकर नियम, PAN कार्ड प्रक्रिया आणि रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या नियमांपर्यंत अनेक बाबींमध्ये सुधारणा करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम इंधन बाजारावर दिसून येत असून मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे आधीच दरांवर दबाव आहे. या पार्श्वभूमीवर तेल कंपन्या १ एप्रिलपासून LPG सिलेंडर, ATF, CNG आणि PNG यांच्या नव्या किमती जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरगुती गॅसच्या दरात वाढ किंवा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, करप्रणालीतही (financial year) मोठे बदल होणार आहेत. ‘आयकर अधिनियम, 2025’ लागू करण्यात येणार असून 1961 पासून अस्तित्वात असलेल्या जुन्या कायद्याची जागा हा नवीन कायदा घेणार आहे. करप्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक करण्याचा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये Form 16 संदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आले असून ITR भरण्यासाठी वापरला जाणारा पारंपरिक Form 16 यापुढे उपलब्ध राहणार नाही. त्याऐवजी नवीन स्वरूपातील दस्तऐवज दिला जाईल. तसेच Form 16A चे नाव बदलून Form 131 करण्यात येणार असून संबंधित तिमाही TDS विवरणानंतर 15 दिवसांत तो देणे बंधनकारक असेल.
PAN कार्डशी संबंधित नियमही अधिक कडक करण्यात येत आहेत. १ एप्रिल 2026 पासून नवीन PAN कार्डसाठी अर्ज करताना अधिक कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. तसेच प्रलंबित अर्ज लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठीही प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले आहेत.
रेल्वे प्रवाशांसाठीही १ एप्रिलपासून महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. (financial year) आता ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही. यापूर्वी ही मर्यादा चार तासांची होती. आठ ते 24 तास आधी तिकीट रद्द केल्यास 50 टक्के परतावा मिळेल, तर 24 ते 72 तास आधी रद्द केल्यास 25 टक्के कपात होईल. 72 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास तुलनेने अधिक परतावा मिळणार आहे. या सर्व बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार असल्याने नवीन आर्थिक वर्षात नागरिकांनी या नियमांची माहिती ठेवणे गरजेचे ठरणार आहे.
हेही वाचा :
शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून