‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे,(demanded) मात्र याचा विसर पोलिसांना पडलाय का?, असा प्रकार अकोल्यात घडला आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीला चक्क ड्युटीवरील पोलीस अधिकाऱ्यानेच मुलीला शरीर सुखासाठी पाठवतेस का? अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजेश जाधव असं या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ही घटना काल 31 मार्च रात्री अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीत घडली आहे. या प्रकरणातील आरोप झालेला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याला निलंबित करण्यात आलं आहे.

यासोबतच आरोपी महिलेची छेडखानी केल्याप्रकरणी त्याच्यावर (demanded) सिव्हिल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे.या प्रकारानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आक्रमक होत संबंधित ‘एएसआय’च्या कानशिलात देखील मारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र तो पोलिस वर्दीवर असल्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी उगारलेला हात मागे घ्यावा लागलाय. मात्र, ‘वर्दी घातलीस तू, असं कृत्य करताना लाच कशी वाटत नाही’, असा सवाल वरिष्ठांनी या ASI ला केलाय. हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद झालाय. हाच व्हिडिओ आता ‘माझा’च्या हाती लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 80 लाखाच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात (demanded) अटकेत असलेली महिलेला सिव्हिल पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं. या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एसआय राजेश जाधव नामक पोलीस अधिकाऱ्याने या आरोपी महिलेला तुझ्या मुलीच वय काय? 10 हजार रुपये देतोय रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव, अशी मागणी केल्याचा आरोप होतोय. या प्रकरणानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जुमळे या ठिकाणी दाखल झाले. संबंधित महिलेच म्हणणं ऐकून घेतलं, आणि अशा स्वरूपाची मागणी करणाऱ्या एएसआयच्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न देखील वरिष्ठानी केलाय.

मात्र, या घटनेनंतर पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला होता. (demanded) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील या संदर्भात माहिती देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर चौकशीची सुरु झालीय. थोड्या वेळातच शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलिसावर निलंबनाची कारवाई होणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मात्र, या घटनेनंतर पोलीस ठाण्यातचं महिला असुरक्षित असल्याचं चित्र आहे. त्यामुळे महिला सुरक्षेतेचा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोये.

हेही वाचा :

गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा

या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?

चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *