मध्य पूर्वेतील तणावपूर्ण (internet services) परिस्थितीमुळे जागतिक पातळीवर इंटरनेट सेवांबाबत नव्याने चिंता निर्माण झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला जवळपास एक महिना पूर्ण होत असताना, या युद्धाचा प्रभाव आता जमीन आणि आकाशापुरता मर्यादित न राहता समुद्राच्या तळाशी पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाचा शेवट जवळ आल्याचा दावा केला असला तरी परिस्थिती अद्याप तणावपूर्णच आहे.

जगातील बहुतांश इंटरनेट सेवा या समुद्राखाली टाकलेल्या (internet services) अंडरसी फायबर-ऑप्टिक केबल्सवर अवलंबून आहेत. International Telecommunication Union च्या माहितीनुसार, जागतिक इंटरनेट ट्रॅफिकपैकी तब्बल ९९ टक्के डेटा या केबल्समधून वाहतूक केला जातो. या केबल्स Strait of Hormuz आणि Red Sea सारख्या अतिसंवेदनशील मार्गांमधून जात असल्याने सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत त्यांच्यावर धोका वाढला आहे.
प्रत्यक्षात इराणकडून या केबल्सबाबत (internet services) कोणतीही अधिकृत धमकी देण्यात आलेली नसली तरी इराण समर्थित हुती बंडखोरांनी यापूर्वी अनेक वेळा अशा केबल्सना लक्ष्य करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर संकटाची छाया निर्माण झाली आहे. या घडामोडींचा भारतावरही मोठा परिणाम होऊ शकतो. भारतातील सुमारे ६० टक्के इंटरनेट ट्रॅफिक मुंबई येथून युरोपकडे जाणाऱ्या समुद्री मार्गावर अवलंबून आहे, जो याच संवेदनशील भागातून जातो. उर्वरित ट्रॅफिक चेन्नई ते सिंगापूर आणि पुढे प्रशांत महासागरातून वाहतो. त्यामुळे भारताची डिजिटल कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात भू-राजकीय जोखमीच्या छायेत आली आहे.
लाल समुद्रातून सुमारे १७ अंडरसी केबल्स जात असून त्या फायबर (internet services) ऑप्टिक कोअर, कॉपर वायरिंग आणि मजबूत संरक्षणात्मक थरांनी बनलेल्या असतात. या केबल्सद्वारे दर सेकंदाला प्रचंड प्रमाणात डेटा ट्रान्सफर केला जातो. जर या केबल्सना कोणत्याही कारणाने नुकसान झाले, तर इंटरनेट पूर्णपणे बंद पडणार नाही, कारण नेटवर्क विविध मार्गांनी जोडलेले असते. मात्र ट्रॅफिक इतर मार्गांकडे वळवल्याने नेटवर्कवर ताण वाढू शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून इंटरनेटचा वेग कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी