भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. (comforting decision) 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेल्या नव्या नियमानुसार आता प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या अवघ्या 30 मिनिटे आधीही आपले बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा मिळणार आहे. या बदलामुळे अचानक प्रवासाच्या नियोजनात बदल झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यापूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलण्यासाठी (comforting decision) प्रवाशांना किमान 24 तास आधी विनंती करावी लागत होती. मात्र, नव्या नियमामुळे ही मर्यादा मोठ्या प्रमाणात सुलभ करण्यात आली आहे. आता IRCTCच्या अधिकृत वेबसाइट, मोबाईल अॅप किंवा रेल्वे रिझर्व्हेशन काउंटरच्या माध्यमातून ही सुविधा सहज उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी केलेल्या बदलाची नोंद सेकंड रिझर्व्हेशन चार्टमध्ये अपडेट केली जाणार असल्यामुळे प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही. या निर्णयामुळे विशेषतः शेवटच्या क्षणी प्रवासात बदल करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

हेही वाचा :

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *