आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांना पक्षानेच धक्का दिला आहे. (removed) राज्यसभेवरील ‘आप’च्या उपनेतेपदावरुन चड्ढांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चड्ढा हे २०२३ पासून राज्यसभेवर ‘आप’चे उपनेतेपद भूषवत होते. अचानक झालेला निर्णय चड्ढांसाठी धक्का मानला जात असून पक्षात फूट पडल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

फेरबदलाबाबत राज्यसभा (removed) सचिवालयाला आम आदमी पक्षाकडून औपचारिक पत्र पाठवण्यात आले आहे. चड्ढा यांना संसदेत बोलण्यासाठी वेळ देऊ नये, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आप आणि पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींवर राघव चड्ढा यांनी मौन बाळगल्यामुळे पक्षात फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आले होते, अशा वेळी पक्षाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात न्यायालयाने ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतरांना सर्व आरोपांतून निर्दोष ठरवल्यानंतर राघव चड्ढा यांनी सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना मिळालेल्या या दिलाशाबद्दल त्यांनी सोशल मीडियावरही कोणतीच पोस्ट केली नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु झाली होती.

पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांनाही राघव चड्ढा अनुपस्थित होते. केजरीवाल (removed) यांनी पक्ष कार्यालयात घेतलेली पत्रकार परिषद असो किंवा जंतर मंतर येथील ‘जनसभा’, सत्ताधारी भाजपवर आम आदमी पक्ष जोरदार हल्ला चढवताना चड्ढांची अनुपस्थिति लक्षणीय ठरली. व्यवसायाने सीए असलेले ३७ वर्षीय राघव चड्ढा हे २०१२ मधील आम आदमी पक्षाच्या सुरुवातीपासूनच सोबत आहेत. ते केजरीवाल यांचे निकटवर्ती मानले जात. ते ‘आप’चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष असून, राज्यसभेतील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या राजकीय व्यवहार समितीचे सदस्य आहेत. इंडिया आघाडीच्या समन्वयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

दिल्लीची आमदारकी भूषवल्यानंतर (removed) पक्षाने त्यांना राज्यसभेवर संधी दिली. त्यामुळे वरिष्ठ सभागृहातील सर्वात तरुण सदस्यांपैकी एक ठरण्याचा मान त्यांना मिळाला. राघव चड्ढा यांनी दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. तसंच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे सल्लागार म्हणूनही काम पाहिलं आहे. सध्या चड्ढा यांच्याकडे पक्षाचे पंजाब सह-प्रभारी म्हणून जबाबदारी आहे. पक्षाच्या कामकाजापासून अलिप्त राहिल्याबद्दल चड्ढांवर टीका होण्याची ही पहिली वेळ नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांना अटक झाली तेव्हा, यूकेमध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेतून बरे होत असल्याचे कारण देत चड्ढांनी उशिरा प्रतिक्रिया दिली होती.

हेही वाचा :

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *