अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. (announced) या युद्धामुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिका आणि इस्त्रायलवर मिसाईल हल्ले सुरूच आहेत. इराणकडून केवळ अमेरिका आणि इस्त्रायललाच लक्ष्य केलं जात नाहीये, तर ज्या -ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेची लष्करी तळं आहेत, त्या सर्व आखाती देशांवर देखील इराणकडून हल्ला करण्यात आला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यामुळे सध्या संपूर्ण जगभरात प्रचंड मोठी इंधन टंचाई निर्माण झाली आहे. याचा काही प्रमाणात फटका हा भारताला देखील बसला आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमधून येणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. हे युद्ध जर अधिक काळ सुरू राहिलं तर जगाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता हे युद्ध लवकर संपवावं, युद्धविराम व्हावा अशीच संपूर्ण जगाची इच्छा आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता एक गुडन्यूज समोर येत आहे, (announced) ती म्हणजे आता लवकरच इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये युद्धविरामाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र जरी युद्धविरामाची घोषणा झाली तरी देखील हा युद्धविराम कायमस्वरूपी नसून काही दिवसांसाठी युद्धविराम होणार आहे. त्यासाठी रशियाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या पुढाकारातून हा युद्धविराम घडून येणार आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार रशिया हे युद्ध थांबवाव यासाठी हा युद्धविराम घडवून आणत नाहीये तर इराणमध्ये रशियाचे अनेक नागरिक अडकले आहेत, त्यांच्या सुटकेसाठी हा युद्धविराम होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
इराणच्या बुशहर न्यूक्लियर पावर प्लांटमध्ये रशियाचे (announced) जवळपास 400 ते 700 कर्मचारी काम करत आहेत. त्यातील काही जणांची यापूर्वीच रशियाने सुटका केली आहे. मात्र जे रशियाचे नागरिक या युद्धात इराणमध्ये अडकले आहेत, त्यांच्या सुटकेसाठी रशिया आता अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम घडवून आणणार आहे. यासाठी रशिया लवकरच इस्त्रायल आणि अमेरिकेसोबत बोलणार आहे. तसेच इराण हे रशियाचे मित्र राष्ट्र असल्यामुळे ते देखील युद्धविरामासाठी तयार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. युद्धविराम करून आपले नागरिक सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचा प्लॅन रशियाकडून बनवण्यात आला आहे.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी