बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या जोडप्यांपैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय (divorce)आणि अभिषेक बच्चन गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसत होत्या. दोघे विभक्त होणार असल्याच्या अफवाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने अखेर आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले. या मुलाखतीत त्याने पत्नी ऐश्वर्या रायसोबतच्या नात्याबद्दल बोलताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

अभिषेक बच्चनने सांगितले की, त्याच्या आणि ऐश्वर्या रायच्या नात्याची (divorce)सुरुवात मैत्रीपासून झाली होती. दोघांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र कामही केले होते. त्या काळात त्यांच्यात प्रेमसंबंध नव्हते, पण ते चांगले मित्र होते. पुढे त्यांचे नाते अधिक घट्ट झाले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अभिषेक म्हणाला की, त्यांच्या नात्यात सुरुवातीपासूनच “पार्टनरशिप” महत्त्वाची राहिली आहे. “मला अशा लग्नात राहायचे नव्हते जिथे मला फक्त पुरुष असल्यासारखे वागावे लागेल किंवा पत्नीने स्वतःचे करिअर सोडावे,” असे तो म्हणाला.

अभिषेक बच्चनने स्पष्ट सांगितले की लग्नानंतर पत्नीने काम करणे थांबवावे, (divorce)अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. उलट त्याला आपल्या पत्नीच्या यशाचा अभिमान वाटतो. त्याने सांगितले की, त्याच्या आई-वडिलांच्या नात्यातही अशीच समजूत होती. त्यावेळीही त्याची आई वडिलांपेक्षा मोठी स्टार होती.दरम्यान, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा काही काळापासून सुरू होत्या. काही वृत्तांनुसार ऐश्वर्या रायने मुंबईतील ‘जलसा’ बंगला सोडल्याचीही चर्चा होती. मात्र या सर्व अफवांवर अभिषेक बच्चनच्या या वक्तव्यामुळे काही प्रमाणात पडदा पडल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा :

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *