राज्यातील तरुणांसाठी संरक्षण सेवेत करिअर घडवण्याची मोठी संधी समोर आली असून (big opportunity) राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या भरतीसाठी तब्बल 75 हजार उमेदवारांनी हजेरी लावली असून केवळ 291 पदांसाठी ही स्पर्धा रंगत आहे. त्यामुळे या भरतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

वरणगाव (big opportunity) येथे स्थापन होणाऱ्या SRPF च्या नव्या गटासाठी ही भरती होत आहे. विविध जिल्ह्यांतून आलेल्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याने प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. उमेदवारांना कॅम्पमध्येच राहण्याची आणि जेवणाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, ओआरएस, फळे आणि बिस्किटे यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. उमेदवारांची 100 मीटर धाव आणि 5 किलोमीटर रनिंग चाचणी पहाटे 4 वाजल्यापासून सुरू केली जाते. वाढत्या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून चाचण्या लवकर घेतल्या जात आहेत. दररोज सुमारे 2000 उमेदवारांची चाचणी घेतली जात असून संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन दक्ष आहे.

उमेदवारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. (big opportunity) याशिवाय रात्री उशिरा शहरात पोहोचणाऱ्या उमेदवारांसाठी वाहतूक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले, जसे की इंजिनिअरिंग, बीएससी अ‍ॅग्रीकल्चर आणि बी-फार्मा पदवीधरही या भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. ही भरती प्रक्रिया 7 मेपर्यंत सुरू राहणार असून मोठ्या संख्येने तरुण सहभागी होत असल्याने राज्यात रोजगाराच्या संधींबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा :

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *