अमेरिका–इराण–इस्त्रायल तणावामुळे जागतिक परिस्थिती अधिकच अस्थिर होत (Iran-Israel tensions) असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर C-Voter ने मार्च महिन्यात देशभरात घेतलेल्या विशेष वॉर सर्व्हेमधून भारतीय जनतेच्या मनातील चिंतेचे आणि बदलत्या भूमिकेचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.

या सर्व्हेनुसार, (Iran-Israel tensions) बहुसंख्य भारतीय नागरिकांना भारताने या संघर्षात तटस्थ भूमिका घ्यावी असे वाटते. सुमारे 60 टक्के लोकांनी भारताने थेट कोणत्याही बाजूने उभे राहू नये, अशी भूमिका मांडली आहे. मात्र परिस्थिती गंभीर झाली आणि एखाद्या एका देशाची साथ देण्याची वेळ आलीच, तर मोठ्या प्रमाणावर लोकांचा कल इराणकडे झुकलेला दिसतो. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात 56 टक्के लोकांनी इराणला समर्थन देण्याची भूमिका घेतली होती, जी तिसऱ्या आठवड्यात 62 टक्क्यांवर आणि चौथ्या आठवड्यात तब्बल 74 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
याउलट, अमेरिकेबाबतचा विश्वास (Iran-Israel tensions) घटताना दिसतो. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात 44 टक्के लोकांनी अमेरिकेची बाजू घ्यावी असे मत व्यक्त केले होते. मात्र तिसऱ्या आठवड्यात हा आकडा 38 टक्क्यांवर आला आणि चौथ्या आठवड्यात केवळ 26 टक्क्यांवर घसरला. संकटाच्या काळात कोणावर विश्वास ठेवावा, या प्रश्नावरही नागरिकांनी अमेरिकेपेक्षा इराणवर अधिक विश्वास दाखवला आहे. इराणवरील विश्वासाचा टक्का सातत्याने वाढताना दिसत असून, चौथ्या आठवड्यात 58 टक्के लोकांनी इराणच्या बाजूने मत व्यक्त केले आहे.
हा सर्व्हे केवळ आकडेवारी नसून, भारतातील जनमतात होत असलेल्या सूक्ष्म बदलांचे संकेत देतो. जागतिक स्तरावर वाढत चाललेल्या संघर्षामुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे, आणि त्याचवेळी भारताने सावध व संतुलित भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :
नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत
शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स
पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप