राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (online examination) कक्षाच्या एलएलबी तिसऱ्या वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. २ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या परीक्षेतील सामान्य ज्ञान विभागात “शिवाजीच्या मंत्रीमंडळाचे नाव काय होते?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याचा आरोप होत असून, हा प्रकार अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या प्रकरणावर दौंडचे आमदार राहुल कुल यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. (online examination) त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवत या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ज्यांच्या कार्यावर आजचे प्रशासन उभे आहे आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला नवे रूप दिले, अशा महान व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख शैक्षणिक परीक्षेत निष्काळजीपणे होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याचेही त्यांनी नमूद केले.
परीक्षेला बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी या प्रश्नाबाबत (online examination) नाराजी व्यक्त करत तक्रारी केल्याचेही कुल यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या चुकीबद्दल सीईटी सेलने सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशीही त्यांची भूमिका आहे.
यासोबतच (online examination) भविष्यात अशा प्रकारची चूक होऊ नये यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. शासकीय तसेच शैक्षणिक स्तरावर महापुरुषांचा उल्लेख करताना पूर्ण नाव आणि आदरयुक्त संबोधन वापरणे बंधनकारक करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेतील संवेदनशीलतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा :
नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत
शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स
पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप