कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
इराणची शरणागती हा व्यक्तिगत प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून अमेरिकेच्या (personal)डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यासाठी संपूर्ण पश्चिम आशियाला वेठीस धरले आहे.आता तर त्यांनी युद्ध नियम बाजूला ठेवून इराणच्या प्राथमिक, पायाभूत सुविधांवर अधिक तीव्रतेने हल्ले सुरू केले आहेत. त्याचे प्रतिकूल परिणाम पश्चिम आशियामधील शांतता प्रिय देशांवर होऊ लागले आहेत. आता युद्धाच्या केंद्रस्थानी हार्मोझ सामुद्रधुनी आणली गेली आहे.युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने हार्मोझ सामुद्रधुनीला हत्यार बनवले आहे. सर्व प्रकारची जलवाहतूक बंद केली आहे. ज्यांच्या जहाजांना वाहतुकीचा परवाना दिला आहे त्या राष्ट्राकडून टोल वसुली केली जात आहे. इराणच्या या युद्धनीतीविरुद्ध जवळपास 40 राष्ट्रांनी आवाज उठवला आहे. इराणने यासंदर्भातील हटवादी भूमिका सोडून द्यावी आणि सर्वच देशातील जहाजांना वाहतुकीसाठी सामुद्रधुनी वापरण्यास द्यावी असे आवाहन करतानाच इराणच्या कुस्तीचा निषेधही नोंदवला आहे. अर्थात इराणने त्याची अजिबात दखल घेतलेली नाही. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्मोझ सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली करावी अन्यथा गंभीर परिणामाला सामोरे जा असा कडक दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध सुरू झाल्यापासून वेळोवेळी केलेल्या आवाहनाला इराणने केराची टोपली दाखवली आहे. उलट आमच्या अटी शर्ती मान्य करा, मग आम्ही विचार करू असे सांगितले आहे. एकूणच इराण तसुभरही मागे हटायला तयार नाही.

युद्ध तुम्ही सुरू केले आहे आणि ते आम्ही थांबवणार आहोत अशा भूमिकेत (personal) इराण हा पहिल्यापासून आहे. इराण मधील 37 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला भव्य पूल अमेरिकेने जोरदार हल्ला करून तो जवळजवळ उध्वस्त केला आहे. त्याचे व्हिडिओ सुद्धा अमेरिकेने व्हायरल केले आहेत. त्यानंतर इराणने जॉर्डन, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीरात या चार देशातील आठ प्रमुख पूल बुडवून टाकण्याची धमकी दिली आहे. तसे झाले तर या देशांची हालत फारच बिकट होणार आहे.युद्ध सुरू करताना त्याची काही नियमावली आहे. त्याचे काही संकेत आहेत. नागरी वस्तीवर हल्ले करायचे नाहीत, शाळा आणि रुग्णालयांवर हल्ले करायचे नाहीत, पायाभूत सुविधांवर हल्ले चढवायचे नाहीत असे काही नियम आहेत.
पण डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध फारच व्यक्तिगत पातळीवर घेतलेले आहे (personal)आणि ते स्वतःसाठी प्रतिष्ठेचे सुद्धा बनवले आहे आणि म्हणूनच त्यांनी पायाभूत सुविधांवर हल्ले चढवायला सुरुवात केलेली दिसते. इराण मधील सर्वात लांबीचा पूल उध्वस्त करणे, वॉटर प्लांट उध्वस्त करणे हे त्याचेच द्योतक आहे.आत्तापर्यंतच्या युद्धात इराणचे अपरिमित नुकसान झालेले आहे. अमेरिकेने तेथील नेतृत्वाची एक फळी कापून काढली आहे. अंदाधुंद क्षेपणास्त्र हल्ले करून अनेक शहरात इजरायल अमेरिका यांनीगाढवाचा नांगर फिरवला आहे. अनेक शहरांची स्थिती उद्ध्वस्त धर्मशाळेसारखी झालेली आहे. असेच युद्ध लांबत गेले तर इराण मध्ये गाझापट्टी सारखी परिस्थिती निर्माण होणार आहे. गाझापट्टी पुन्हा उभी करण्यासाठी किती वर्षे लागतील हे बांधकामक्षेत्रातला तज्ञ आहे किंवा संघटनाही सांगू शकणार नाही.
हेही वाचा :
लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार
चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!