धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे (murder case) परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणाने राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (murder case) आरोपी अजित अपन्ना वासुदेव याने पत्नी लिंबाबाई वासुदेव आणि आठ वर्षांची मुलगी मानसी यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. घटनेनंतर आरोपी स्वतःहून मुरूम पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीला पत्नीच्या (murder case) चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून त्याने प्रथम पत्नीची हत्या केली. ही घटना मुलीने पाहिल्यानंतर तिलाही ठार मारण्यात आले. विशेष म्हणजे, या वेळी घरात असलेल्या मुलालाही मारण्याचा आरोपीचा प्रयत्न होता, मात्र तो कसाबसा पळून जाऊन बचावला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *