दिंडोरी तालुक्यात सलग घडलेल्या दुर्दैवी घटनांनी परिसरात शोककळा पसरली आहे. (unfortunate incidents) काही दिवसांपूर्वी कार विहिरीत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी चार चिमुरड्यांचा पाण्यात बुडून आणि एका मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आठवडाभरातच अकरा मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.

मोहाडी येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमादरम्यान खेळता खेळता दोन आते-मामेभाऊ तलावाजवळ गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. कार्यक्रमस्थळी मुलं दिसत नसल्याने शोध सुरू झाला आणि ही दुर्घटना उघडकीस आली. आनंदाच्या वातावरणात अचानक दुःखाचे सावट पसरल्याने संबंधित कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे.

दरम्यान, परमोरी येथेही अशीच (unfortunate incidents) हृदयद्रावक घटना घडली. नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी एकाला पाण्यात गटांगळ्या खाताना पाहून दुसरा त्याला वाचवण्यासाठी गेला; मात्र दोघेही खोल पाण्यात बुडाले. स्थानिकांनी तत्काळ मदत करून त्यांना बाहेर काढले, परंतु रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने गावात शोकसागर पसरला असून दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तिसऱ्या घटनेत कादवा म्हाळुंगी येथे १३ वर्षीय मुलाचा झोका खेळताना गळ्याला फास (unfortunate incidents) लागून मृत्यू झाला. यात्रेच्या उत्साहात सहभागी झाल्यानंतर तो इतर मुलांसोबत खेळत असताना ही दुर्घटना घडली. कुटुंबीयांच्या लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता. सलग घडलेल्या या घटनांमुळे दिंडोरी तालुक्यात भीती आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांकडून लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *