राज्यातील महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला (ambitious) असून लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केलं आहे की, ज्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचा मासिक आर्थिक लाभ थांबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात, मात्र आता या लाभासाठी कठोर निकषांची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

योजनेच्या सुरुवातीला (ambitious) मोठ्या प्रमाणावर महिलांना लाभ देण्यात आला होता. सोलापूर जिल्ह्यातच १८ वर्षांवरील मतदारसंख्या सुमारे १८ लाख ७७ हजार असताना तब्बल ११ लाख २१ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता. मात्र, नंतर झालेल्या पडताळणीत अनेक अनियमितता समोर आल्या. वयोमर्यादेबाहेर असतानाही लाभ घेणाऱ्या तसेच उत्पन्न निकषात न बसणाऱ्या महिलांची संख्या मोठी असल्याचे उघड झाले.

विधानसभा निवडणुकांपर्यंत महिलांना सरसकट लाभ देण्यात आला होता. (ambitious) मात्र त्यानंतर प्रशासनाने घराघरात जाऊन पडताळणी सुरू केली. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर महिला अपात्र ठरल्या असून त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. विशेषतः २१ ते ६५ वर्षे वयोगटात नसलेल्या, कुटुंबाकडे चारचाकी वाहन असलेल्या, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

महिला व बालविकास (ambitious) विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यापासून या सर्व अपात्र महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार आहे. त्यामुळे संबंधित महिलांना दरमहा मिळणारी १५०० रुपयांची आर्थिक मदत पुढे मिळणार नाही. प्रशासनाने पात्र महिलांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा त्यांनाही योजनेपासून वंचित राहावे लागू शकते.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *