सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी घडामोड घडत असून जागतिक (fuel prices) पातळीवरील तणाव कमी झाल्यामुळे इंधन दरात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. या निर्णयाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या दरांवर दिसून आला असून किंमतींमध्ये मोठी घसरण नोंदवली जात आहे.

युद्धविरामानंतर कच्च्या (fuel prices) तेलाच्या बाजारात मोठी हालचाल झाली असून दर सुमारे १५ टक्क्यांनी खाली आले आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत १०० डॉलरच्या खाली घसरली आहे, तर ‘वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट’ क्रूडही सुमारे ९५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आला आहे. या घसरणीमुळे जागतिक स्तरावर इंधन दर कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
युद्धामुळे काही दिवसांपासून हॉर्मुझ सामुद्रधुनी येथे वाहतूक अडथळ्यांमध्ये अडकली होती. (fuel prices) या मार्गावरून होणारी तेलवाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक देशांमध्ये इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता युद्धविरामानंतर या सामुद्रधुनीतून पुन्हा सुरक्षितपणे जहाजांची वाहतूक सुरू होणार असल्याने जागतिक पुरवठा साखळी सुरळीत होण्याची शक्यता आहे.
भारतासाठी ही (fuel prices) घडामोड विशेष महत्त्वाची मानली जात आहे. कारण भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करतो आणि त्यात इराणमार्गे येणाऱ्या पुरवठ्याचा मोठा वाटा आहे. गेल्या काही दिवसांत टँकरच्या हालचालींवर मर्यादा आल्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. आता परिस्थिती सुधारल्याने इंधनाचा पुरवठा स्थिर होईल आणि दरात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा
वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू