बॉलिवूडमध्ये सध्या रणवीर सिंहच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा जोरदार बोलबाला पाहायला मिळत असताना, अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या शांततेने सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगवली होती. चित्रपटाच्या प्रचंड यशानंतरही दीपिकाने कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे अनेकांनी तिला लक्ष्य करत ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. (Dhurandhar 2) मात्र आता दीपिकाने या सगळ्या चर्चांना एकाच उत्तरात पूर्णविराम दिला आहे.

सोशल मीडियावर एका व्हिडिओ पोस्टमधून दीपिकाच्या मौनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ‘धुरंधर 2’च्या विक्रमी यशानंतरही ती प्रीमियरला उपस्थित राहिली नाही, सोशल मीडियावर पोस्ट केली नाही, (Dhurandhar 2) यावरून तिच्यावर टीका करण्यात आली. या सर्व चर्चांदरम्यान दीपिकाने कमेंट सेक्शनमध्ये दिलेलं उत्तर आता चांगलंच व्हायरल होत आहे.दीपिकाने आपल्या खास शैलीत ट्रोलर्सना उत्तर देताना स्पष्ट केलं की, “तुम्ही शेवटी जे म्हटलं तेच खरं आहे… आणि हो, हा चित्रपट मी तुम्हा सगळ्यांपेक्षा आधीच पाहिला होता.” तिच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर वातावरण बदलताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या उत्तराचं समर्थन करत अनावश्यक ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी करत असून देश-विदेशात कोट्यवधींची कमाई करत आहे. या चित्रपटाला अल्लू अर्जुन, रजनीकांत, महेश बाबू, अनुपम खेर, कंगना राणौत, विजय देवरकोंडा आणि ज्युनिअर एनटीआर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनीही उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. एकीकडे चित्रपटाचं यश आणि दुसरीकडे सोशल मीडियावरील चर्चा (Dhurandhar 2) यामुळे ‘धुरंधर 2’ सातत्याने चर्चेत राहिला आहे. मात्र दीपिकाच्या या स्पष्ट प्रतिक्रियेनंतर तिच्यावरील ट्रोलिंगला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *