Paytm ने एक मोठे अपडेट सादर केले आहे. युझर्सला UPI पेमेंट (phone)आणि रोख रक्कम काढणे अत्यंत सोपे होईल. कंपनीने ॲपला बायोमॅट्रिक ऑथेन्टिकेशन फीचरसोबत जोडले आहे. त्याच्या मदतीने युझर्स आता फेस अनलॉक फीचरचा वापर करत पेमेंट करू शकतील. आतापर्यंत UPI पेमेंटसाठी PIN टाकणे आवश्यक होते. पण नवीन फीचरमुळे युझर्सला त्यांचा युपीआय पिन लक्षात ठेवणे गरजेचे नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे Paytm कंपनीने कार्डलेस ATM विड्रॉल ही सुविधाही सुरु केली आहे. म्हणजे एटीएम कार्ड नसले तरी थेट एटीएम केंद्रावर जाऊन या ॲपच्या माध्यमातून सहज पैसे काढू शकतात.

पेटीएमने आपल्या ॲपमध्ये बायोमॅट्रिक ऑथेन्टिकेशनचे फीचर जोडले आहे.(phone) त्याआधारे युझर्स फिंगरप्रिंट वा फेस लॉकच्या मदतीने UPI पेमेंट करू शकतात. आता प्रत्येक वेळी UPI PIN टाकण्याची गरज नाही. केवळ फोन अनलॉक करावा लागेल आणि पेमेंट होईल. बायोमॅट्रिक ऑथन्टिकेशन ही एक सुविधा नाही. तर त्यात सुरक्षा पण मिळेल. फिंगरप्रिंट आणि फेस डेटा हा युनिक असतो. त्यामुळे फसवणुकीचा धोका कमी होतो.

Paytm ने दुसरे सर्वात मोठे अपडेट दिले आहे. विना कार्ड आता एटीएमवर जाऊन पैसे काढता येतील. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम ॲपच्या मदतीने रोख रक्कम काढता येईल. ATM मशीनवर QR कोड स्कॅन करता येईल. विना ATM कार्ड रोख रक्कम काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. सर्वात अगोदर Paytm ॲपवर जाऊन रोख रक्कम काढण्याचा पर्याय निवडा. त्यानंतर ATM वर QR कोड स्कॅन करा. आता पुढील प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर एटीएम मशीनमधून रक्कम बाहेर येईल. हे अपडेट खास करून त्या युझर्ससाठी खास आहे जे एटीएम कार्ड नेहमी विसरतात आणि एटीएम केंद्रावर जातात.

विना कार्ड ATM मधून पैसे काढण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.(phone) त्यासाठी सर्वात अगोदर पेटीएम हे ॲप उघडा. त्यानंतर “Cash Withdrawal” वा “ATM Withdrawal” हा पर्याय निवडा. तुम्हाला किती रक्कम काढायची. ती काढा. त्यानंतर ॲपवर एक QR कोड वा रिक्वेस्ट जनरेट करेल. आता ज्या ATM वर क्यूआर कोड स्कॅनची सुविधा उपलब्ध आहे, तिथे तुम्हाला या सुविधेचा वापर करता येईल आणि पैसै काढता येईल.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *