भोंदू अशोक खरात याला आज न्यायालयात हजार करण्यात येईल.(complaints)पहिल्या प्रकरणात त्याला कोर्टात हजर करण्यात येईल. एका अन्य प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आता खरातविरोधात अनेक महिला तक्रारीसाठी पुढे येत आहेत. कुटुंबियांना विश्वासात घेऊन या महिला त्याच्याविरोधात तक्रारीसाठी सरसावल्या आहेत. तक्रारींचा जणू महापूर आला आहे. त्याच्याविरोधात महिला पुढे येत असल्याने त्याचा पाय खोलात गेला आहे. आता त्याची सुटका होण्याची कोणतीच चिन्ह नाही. मात्र राजकीय नेत्यांवर अद्याप कारवाई का होत नाही, असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत.भोंदू अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा वाढला आहे. आणखी ११ महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आता पर्यंत पीडित महिलांच्या एकूण १९ तक्रारी एसआयटीला प्राप्त झाल्या आहेत. अनेक महिलांना धाडस दाखवत खरातने केलेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे. त्याच्याविरोधात तक्रार करण्यासाठी महिलांना कुटुंबियांनी सुद्धा साथ दिल्याचे समोर येत आहे.

‘ऊर्जा, पूजा आणि शरीरशांती’च्या नावाखाली खरातने या पीडितांचे शोषण केल्याचा (complaints)आरोप करण्यात आला आहे. विविध पूजा विधी आणि भीती घालून त्याने महिलांचे शोषण केल्याचे समोर येत आहे. भीती दाखवून खरात महिलांना जाळ्यात ओढत होता. त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करत होता. तो प्रसाद, अंगारा अथवा तीर्थ म्हणून देत असलेल्या पदार्थात गुंगीचे अथवा इतर उत्तेजक औषधं असल्याचा आरोप करण्यात येत आहे. भोंदू अशोक खरातविरुद्ध आतापर्यंत १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.भोंदू अशोक खरातला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्याची पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार आहे. पोलीस पुढील गुन्ह्यात पुन्हा ताबा मागण्याची शक्यता आहे. SIT ने कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तपासातील महत्त्वाचे खुलासे केले आहेत. सुरक्षा कारणास्तव मागील सुनावणी ऑनलाईन झाली होती. आजही ऑनलाईन सुनावणी होण्याची शक्यता आहे. याविषयीची माहिती थोड्याच वेळात समोर येईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे या (complaints)भोंदू खरातच्या हस्तक असून त्यांच्यापासून सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस धोका असल्याच्या उल्लेखाचे एक निनावी पत्र सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत. यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळासह सर्वत्र या संदर्भात उलट सुलट चर्चा होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना निनावी पत्र व्हायरल करून माझी बदनामी करत राजकारण केले जात आहे. पत्र व्हायरल करणाऱ्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार आहे. तर आपल्यापासून सुनेत्रा पवारांना धोका नाही त्यांच्या आदेशानुसार आम्ही काम करत आहोत हे आमच्या पक्षासह इतर पक्षातील लोकांकडून राजकारण केले जात आहे अशी प्रतिक्रिया प्रज्ञा खोसरे यांनी दिली आहे.
हेही वाचा :
”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा
वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू