भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची माजी पत्नी आणि कोरिओग्राफर(choreographer)-डान्सर धनश्री वर्माने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. घटस्फोटाच्या शेवटच्या सुनावणीदरम्यान तिने कोर्टात अनुभवल्या गेलेल्या भावनिक क्षणांचीही आठवण सांगितली.धनश्री म्हणाली, “निकाल लागल्यानंतर मी मागच्या गेटने कोर्टातून बाहेर पडले. मीडियाला सामोरं जायचं नव्हतं. नंतर गाडीत बसल्यावर चहलचा फोटो पाहिला आणि मला धक्का बसला. मला वाईट वाटलं. मी विचार करत होते की याच्यासाठी मी इतकी रडत होते का? त्या घटनेनं मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली.”

तिने पुढे सांगितले की, घटस्फोटाच्या शेवटच्या सुनावणीदरम्यान ती अत्यंत भावूक झाली होती. “जेव्हा निकाल वाचून दाखवला गेला, तेव्हा मी सर्वांसमोर ढसाढसा रडत होते. माझ्या भावना शब्दांत मांडणं शक्य नाही,” असे धनश्री म्हणाली.यावेळी तिच्यावर झालेल्या आरोपांबद्दलही तिने प्रतिक्रिया दिली. “खासगी आयुष्य खासगीच ठेवावं लागतं. टाळी एका हाताने वाजत नाही. मी बोलत नाही याचा अर्थ दुसऱ्याने फायदा घ्यावा असं नाही. ते योग्य नाही,” असे ती म्हणाली.
धनश्रीने मुलाखतीत आपली भीतीही उघड केली. “मला आता भूतांपासून भीती वाटत नाही. खरी भीती ही आहे की, कधी कोण पॉडकास्टवर येईल आणि काय बोलेल?” असा खुलासा तिने केला.

बालपणीच्या स्वप्नांविषयी बोलताना धनश्री म्हणाली, “मला डॉक्टर व्हायचं होतं. मी डेंटिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली होती. पण नंतर डान्सनेच मला पुढे नेलं आणि मी कोरिओग्राफर(choreographer) म्हणून काम करायला सुरुवात केली.”धनश्रीच्या या स्पष्ट कबुलीजबाबामुळे पुन्हा एकदा तिचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत आलं आहे.
हेही वाचा :
एकाच वेळी आईला अन् गर्भवती लेकीला मृत्यूनं कवटाळलं….
शुबमन नाही हा खेळाडू होणार वनडे टीमचा कॅप्टन
नाला ओलांडताना मुख्याध्यापकच गेले वाहून; दुसऱ्या दिवशी थेट मृतदेहच..