आईच्या मृत्यूला (death)अनेक वर्ष झालीत पण अद्यापही नाही मिळाला मृतदेह… स्वतःला सर्वांपासून दूर केल्यानंतर कसं आलं अभिनेत्रीच्या आईला मरण.., अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितलं नक्की काय घडलेलं.अभिनेते कबीर बेदी यांनी 4 लग्न केली आहे. नुकताच कबीर बेदी त्यांच्या चैथ्या लग्नामुळे चर्चेत आले. याच दरम्यान कबीर यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी पूजा बेदी हिने आईच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा केला आहे. पूजाने सांगितलं की, तिची आई एक प्रतीमा एक डान्सर होती. पूजा हिच्या आईने कायम स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणं पसंत केलं. एवढंच नाही तर, प्रतीमा यांनी मृत्यू देखील स्वतःच्या आनंदाने निवडला. पण प्रतीमा यांचा मृतदेह कधीच कुटुंबियांना सापडला नाही.

नुकताच झालेल्या मुलाखतीत पूजा बेदी म्हणाली, ‘माझ्या मनात एकाच गोष्टीची खंत आहे आणि ती म्हणजे माझी आई 50 वर्षांची देखील नव्हती आणि तिच्यासोबत खूप काही बोलायचं होतं… पण ती अशी एक महिला होती. जी स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत होती.’‘तिला हवं तसं ती जगली आणि तिला हवं तसं मृत्यू देखील आलं… ती कायम म्हणायची तिला निसर्गाच्या सानिध्यात मृत्यू हवा आहे आणि तसंच झालं. आईची इच्छा होती की, कोणत्या अंत्यसंस्कारासाऱ्या विधींमध्ये सहभागी व्हायचं नव्हतं… आईचा मृतदेह आम्हाला अद्याप सापडलेला नाही… जसं तिला हवं होतं, तसंच झालं, शेवटच्या क्षणी प्रतिमा निसर्गाचा एक भाग बनली…’
एवढंच नाही तर, पूजा हिने आईच्या स्वभावाबद्दल देखील सांगितलं… ‘आम्ही गृहपाठ केलेला आईला आवडत नव्हतं… शाळेतले तुम्हाला घरी काम कसं देतात? तुमच्यासोबत हा माझा वेळ आहे… तुम्ही गृहपाठ करु नका… मला आजही आठवतं, ती आम्हाला पाटीवर एबीसीडी काढायला लावयची… ती एक आनंदी स्त्री होती…’ असं देखील पूजा म्हणाली.

स्वतःला सर्वांपासून वेगळं करताना पूजा बेदी हिला प्रतिमा यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या. पूजा म्हणाली, ‘आई जवळ आली आणि मृत्यूपत्र लिहून दिलं. स्वतःचे सर्व दागिने दिले, सर्व प्रॉपर्टीचे महत्त्वाचे कागदपत्र मला दिले आणि म्हणाली, तुझा भाऊ आता या जगात नाही. त्याने आत्महत्या केली. डान्स अकॅडमी मी लीन फर्नांजेड यांना दिली…आता तुच माझ्यासाठी सर्वकाही आहेस… मृत्यू(death) झाला तेव्हा आई 50 वर्षांची देखील नव्हती…’ याच गोष्टीची खंत पूजा हिच्या मनात आजही कायम आहे.
हेही वाचा :
भावालं मारलं, वहिनीशी केलं लग्न, 2 मुलीही झाल्या अन्….
७१ हजार महिलांचा निर्णय धक्कादायक; आधार कार्डामुळे समोर आलं सत्य
“बॉलिवूडपासून गायब पण राणीप्रमाणे जगतेय सलमानची ही नायिका”