नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट (health)करण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. या पानांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जाणून घ्या ओव्याची पाने खाण्याची योग्य पद्धत.

बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीरात घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढू लागते. (health)याशिवाय ट्रायग्लिसराईड किंवा हार्मोन्स असंतुलनच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या आहेत. हल्ली कमी वयात अनेक लोक वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत. त्यामुळे चुकीच्या जीवनशैली फॉलो न करता योग्य जीवनशैली आणि आहार घेणे आवश्यक आहे. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर अनेक लोक कायमच दुर्लक्ष करतात, पण असे केल्यामुळे आजार आणखीनच वाढत जातात आणि शरीराला हानी पोहचते. शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या गोळ्या औषधांसोबतच आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन कसे करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
ओव्याच्या पानांचे शरीराला होणारे फायदे:
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओव्याची पाने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. हिरव्यागार ओव्याच्या पानांपासून भजी बनवली जाते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. ट्रायग्लिसराईडची समस्या कमी होते. फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. थायरॉईड, मासिक पाळी, वाढलेलं वजन, हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी अनेक आजारांवर ओव्याच्या पानांचे किंवा ओव्याचे सेवन करावे. तसेच शरीरात वाढलेले सायनस, ब्राँकायटीस, पोटातले इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी ओव्याचे सेवन करावे. कमकुवत झालेली हाडे मजबूत करण्यासाठी ओव्याच्या पानाचे सेवन करावे.
या पद्धतीने करा ओव्याच्या पानांचे सेवन:
ओव्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात ओव्याची पाने, तीळ आणि काळीमिरी टाकून बारीक वाटून घ्या. पातळ पेस्ट तयार केल्यानंतर त्यात एक ग्लास पाणी घालून टोपात पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर पाणी गाळून सेवन करावे. या पाण्याचे दिवसभरातून एकदाच सेवन करावे. आठवड्यातून तीन किंवा चार वेळा ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याचे पाने प्रभावी ठरतील.
हेही वाचा :
2400 कोटींचं कर्ज… अदानींनी परदेशातून का आणला एवढा पैसा
गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर..
‘तर माझी स्वर्गातील जागा फिक्स!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले ते ओपन सीक्रेट