रेल्वे प्रवासात विमान प्रवासाप्रमाणे अतिरिक्त सामानावर दंड आकारला जाणार (passengers)असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वृत्ताला फेटाळून लावत प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, अतिरिक्त लगेजसाठी प्रवाशांना कोणताही दंड द्यावा लागणार नाही.वैष्णव म्हणाले की, अनेक दशकांपासून रेल्वे प्रवाशांसाठी ठराविक वजन मर्यादा आहे, परंतु कोणताही नवा नियम लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यास प्रवाशांकडून जादा शुल्क वसूल केलं जाईल, ही माहिती चुकीची आहे.

अलीकडे काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं होतं की, भारतीय रेल्वे विमान कंपन्यांप्रमाणे लगेजवर कठोर नियम लागू करणार आहे. त्यानुसार ठराविक वजन मोफत आणि त्यापेक्षा जास्त वजनासाठी अतिरिक्त भाडं वसूल केलं जाईल.(passengers) एवढंच नव्हे तर, स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक लगेज मशीन बसवून प्रवाशांच्या बॅगांचे वजन तपासले जाणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. मात्र, रेल्वेमंत्र्यांनी या सर्व बातम्या चुकीच्या ठरवल्या आहेत.
भारतीय रेल्वेच्या विद्यमान नियमांनुसार, प्रवाशांना ठराविक वजन मोफत नेण्याची परवानगी आहे. उदाहरणार्थ,– फर्स्ट क्लास एसी प्रवाशांना 70 किलो,
– एसी सेकंड क्लास प्रवाशांना 50 किलो,
– थर्ड एसी आणि स्लीपर क्लास प्रवाशांना 40 किलो,
– तर जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना 35 किलो सामान मोफत नेण्याची मुभा आहे.
– ही मर्यादा आधीपासून अस्तित्वात असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चालवल्या जाणाऱ्या स्पेशल ट्रेनबाबतही भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की, दिवाळी आणि छठपुजेच्या काळात लाखो प्रवासी आपल्या गावी जातात. (passengers)त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी १२ हजार स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहेत. गेल्या वर्षी सात हजार स्पेशल ट्रेन चालवल्या होत्या, तसेच महाकुंभच्या काळातही मोठ्या प्रमाणावर विशेष गाड्या धावल्या होत्या.
हेही वाचा :
जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर! 20 वर्षांपर्यंत वाढणार रजिस्ट्रेशन
मोठी बातमी, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचा सांगितला टायमिंग
MLA बापाची हिरोइन मुलगी, दोन भावांच्या दुश्मनीचे बनली कारण…