सर्वधर्मसमभावविचार घेऊन चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.(district) आश्वासक चेहरा म्हणून तुम्ही राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याकडे पाहत आहात. तुमच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खूप मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.दिवंगत आमदार पी. एन. पाटील गटाचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश झाला.

अजित पवार म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी शेतकरी, तरुण-तरुणी मागे राहू नये यासाठी आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार न सोडता सत्तेत सहभागी झालो आहोत. (district)स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात सर्वात आधी बेरजेचे राजकारण सुरू केले. काळजी करू नका, तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे ते पूर्ण करू, राहुल भैयांनी चूक केली असे वाटू देणार नाही; हा अजितदादांचा ‘शब्द’ आहे.

मित्रांनो मी कामाचा माणूस आहे. जन्माला आल्यानंतर समाजासाठी काम करायला पाहिजे. शेतकऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही यासाठी काम करायचे असते. लोकसभा निवडणुकीनंतर खचलो नाही, आम्ही जनतेच्या दारात पुन्हा गेलो. घेतलेलं कर्ज परतफेड करणारा शेतकरी हा केवळ कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळतोय. आम्ही शेतकऱ्यांना सोलरवर वीज देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.पी. एन. पाटील आणि विलासराव देशमुख यांचे संबंध सांगत असताना लातूर आणि सडोली खालसा एक समीकरण झाले होते . आता यापुढे सुद्धा सडोली खालसा आणि काटेवाडी नात कशा पद्धतीने असेल हा संपूर्ण महाराष्ट्र पाहील, काळजी करू नका. तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे ते येणाऱ्या काळात पूर्ण करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, बाळासाहेब खाडे ,भैय्या माने ,माजी आमदार राजेश पाटील, बाबासाहेब पाटील, अनिल साळोखे आदी उपस्थित होते.पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि राजेश पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पी .एन .साहेब आज नसले तरी ते आज आपल्याला पाहत आहेत.(district) आपला कार्यकर्ता कसा वागतो आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले. पी. एन .पाटील यांना राजीव गांधी यांना नेता मानले, नंतर विलासराव देशमुख यांना नेता मानले, त्याना कधी सोडले नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना दिला मोठा झटका

बाइकवर रोमान्स! पोलिसांनी देखील घेतली रिलची मजा व्हिडीओ व्हायरल

चोप्रा कुटुंबात येणार नवा पाहुणा, परिणितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गूडन्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *