तज्ज्ञांच्या मते, या आजाराने देशात महिलांचे जगणं मुश्किल केलं आहे. (disease)दर 7 मिनिटाला कुणाची तरी आई, बहीण,पत्नी,मावशी आपल्यातून हिरावली जात आहे. काय आहे कारण? काय आहेत या रोगाची लक्षणं? दर 7 व्या मिनिटाला यमाचे दूत दारी…महिलांमध्ये झपाट्याने बळावतोय हा आजार, लक्षण काय, उपाय माहिती आहे का?

महिलांचा गंभीर आजार देशातील स्त्रीयांवर नवीन संकट आलं आहे. देशात दर 7 मिनिटाला एक महिलेचा या आजारामुळे मृत्यू होत आहे. हा मृत्यूचा फेरा आई,बहीण,पत्नी अथवा नातेवाईक महिलेला आपल्यातून हिरावून नेत आहे. भारतात गर्भाशयाचा मुख कर्करोग झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जगात भारतात या रोगाचे 25 टक्के रुग्ण आहेत. सर्वाईकल कॅन्सर हा महिलामध्ये होणारा एक आजार आहे. गर्भाशयाच्या मुखात हा आजार होतो.

आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.रुचिका गर्ग यांनी याविषयीची माहिती दिली. ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या संसर्गामुळे हा आजार पसरतो. या आजारापासून वाचण्यासाठी लस सुद्धा बाजारात दाखल झाली आहे. काय आहेत या आजाराची लक्षण आणि उपाय जाणून घेऊयात…

डॉ.गर्ग यांच्या दाव्यानुसार, प्रत्येक 7 मिनिटाला एक महिलेचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू होत आहे. या रोगामुळे प्रत्येक वर्षी एक लाखाहून अधिक (disease)महिलांचा मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण जगात भारतात या रोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

या चुकांमुळे वाढला कॅन्सरचा धोका तर हा आजार व्ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या संसर्गामुळे वाढला आहे. तर काही प्रमाणात मानवी चुका सुद्धा त्याला कारणीभूत आहे. यामध्ये एकापेक्षा अधिक लोकांशी शरीरसंबंध अथवा कमी वयात लैंगिक संबंध ही सुद्धा कारणं समोर आली आहेत. पण व्ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा धोका वाढल्याने हा आजार बळावत चालला आहे.

काय आहे उपाय? डॉ. गर्ग यांच्या मते, या आजारापासून वाचण्यासाठी आता बाजारात लस दाखल झाली आहे. कमी वयाच्या मुलींना ही लस टोचून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना या व्हायरसचा संसर्ग होणार नाही. लसीसंबंधी काही मार्गदर्शक सूचना पण समोर आल्या आहेत. त्यानुसार, (disease)9 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलींना ही लस द्यायला हवी. 26 वर्षांपर्यंतच्या महिलांना सुद्धा लस देता येऊ शकते. तर 40 नंतरच्या महिलांनी ही लस घेतली नसेल तर त्यांना पण लस घेता येते.

45 वर्षांपर्यंतच्या महिलांना लस घेता येऊ शकते. हा आजार झाला की नाही हे तपासण्यासाठी एचपीव्हीची चाचणी करता येते. किपपनिकोलाऊची तपासणी करून या आजाराचे निदान होते. आता या आजारावर बाजारात लस उपलब्ध झाली आहे. ही व्हॅक्सीन सरकारी रुग्णालयात उपलब्ध करुन देण्याविषयीची चर्चा सुरू असल्याचे समजते.

हेही वाचा :

‘1 कोटी बहिणींना लखपती….’, CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा..
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
लाडकीला ऑगस्ट अन् सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *