लाडकी बहीण योजनेत लाखो अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे.(advantage)या बोगस लाडक्या बहि‍णींनी सरकारचे कोट्यवधी रुपये लाटले आहेत. याचसोबत अनेक पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. चुकीच्या मार्गाने घेतलेला लाभ बंद करणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी सुरु आहे. ज्या लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेता आहे, त्यांचा लाभ बंद केला जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.काल पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना २६ लाख महिलांनी योजनेचा गैरवापर करुन लाभ घेतला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, या प्रकरणात सरकारकडून चौकशी सुरु आहे. जे लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे. त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन छाननी करत आहे. एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे.(advantage) त्यांच्यात कोणाला लाभ द्यायचा आणि कोणाला नाही हे कुटुंबप्रमुखाने ठरवायचे आहे. त्यानंतर पत्र लिहून द्यायचे आहे. यानंतर त्या महिलांचे लाभ बंद केले जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आता केवायसी करणे अनिवार्य आहे. (advantage)केवायसी केल्यानंतरच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसी केल्यानंतर त्यातून महिलांची पडताळणी केली जाणार आहे. यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे गरजेचे आहे. लवकरच ही प्रक्रिया सुरु होईल.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना दिला मोठा झटका

बाइकवर रोमान्स! पोलिसांनी देखील घेतली रिलची मजा व्हिडीओ व्हायरल

चोप्रा कुटुंबात येणार नवा पाहुणा, परिणितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गूडन्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *