मोबाईल (mobile)फोनमुळे जीवन सुलभ झाले असले तरी त्याचा गैरवापरही वाढताना दिसत आहे. कोलकात्यातील मोबाईल रिपेअर सेंटरमधील एका व्यक्तीने ग्राहकाचा खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर लीक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रेडिटवर एका वापरकर्त्याने आपला भयंकर अनुभव शेअर केला आहे. त्याने लिहिले आहे, “फोन दुरुस्तीला दिल्यानंतर काही तासांतच माझा खासगी व्हिडीओ व्हायरल झाला. मी पूर्णपणे तुटलो आहे. घरच्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं आहे. मी सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केले, फोन नंबर बदलला आणि स्वतःला सर्वांपासून दूर केलं आहे. आता खोलीतूनही बाहेर पडत नाही.”
या वापरकर्त्याने आणखी सांगितले की, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला अश्लील आणि घाणेरडे मेसेज येऊ लागले आहेत. “आता माझी प्रतिमा मलिन झाली आहे. पुढे कसं जगायचं तेच समजत नाही,” असं तो म्हणाला.
या प्रकरणाची दखल घेत पीडित व्यक्तीने सायबर गुन्हे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ही तक्रार महिला पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याचे सांगितले आहे. तपास सुरू असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.मोबाईल(mobile) रिपेअरिंगला देताना डेटा डिलीट करणे, फाइल्स सुरक्षित ठिकाणी बॅकअप करणे आणि संवेदनशील माहिती पासवर्डने लॉक करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा घटना टाळणे कठीण ठरू शकते.
हेही वाचा :
मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू, जरांगेंच्या उपोषणापूर्वी मोठी दुर्घटना
हायकोर्टजवळ सुसाट कार दुभाजकावर धडकून अपघात
“एआय शेतीसाठी ठरणार गेमचेंजर; ऊस उत्पादनात 40 टनांनी वाढEdit