औरंगाबाद : जालना रोडवर मनपाने सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम अर्ध्यावरच थांबल्याने रस्त्यांची अवस्था कधी रुंद तर कधी अरुंद अशी झाली आहे. त्यातच दुभाजकांची उंची अतिशय कमी असल्याने सुसाट वाहने थेट दुभाजकावर चढून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास हायकोर्टजवळ असा आणखी एक अपघात(Accident) घडला.

हनुमाननगरचे सूरज खुशालसिंग राजपूत (वय 32) पत्नीसमवेत सेव्हनहिलकडे कार (एमएच-20-ईजे-4334)ने जात असताना त्यांना अचानक फिट आला. यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि सुरक्षा जाळी तोडत कार थेट जालना रोडच्या दुभाजकावर मधोमध जाऊन धडकली. या भीषण अपघातात (Accident)कारचा चुराडा झाला; मात्र एअरबॅग उघडल्याने दाम्पत्य सुखरूप बचावले. नागरिकांनी तत्परता दाखवत राजपूत यांना रिक्षाने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर डायल-112 पथकातील अंमलदार घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत केली. यापूर्वीही या परिसरात अशाच धडकांमुळे अपघात झाले असून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने मुकुंदवाडीपासून अतिक्रमण हटाव सुरू केला होता; मात्र महावीर चौक ते सेव्हनहिल उड्डाणपुलापर्यंत पोहोचताच बुलडोझर थांबले. त्यामुळे या भागातील रस्ता अरुंद असून सतत अपघात घडत आहेत. नागरिकांचा प्रश्न कायम आहे – “जालना रोडचे रुंदीकरण अखेर कधी होणार?”

हेही वाचा :

पृथ्वी शॉ सोबत दिसलेली ‘मिस्ट्री गर्ल’ कोण आहे

तीन महिन्यानंतर RCB च्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट

गणपतीसाठी गावी निघालेलं कुटुंब बेपत्ता; 40 तासांनंतर…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *