राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या ऊस शेतीत उत्पादन(production) वाढवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर गेमचेंजर ठरणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. श्री छत्रपती कारखान्याच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन व ‘एआयचा शेतीतील वापर’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

पवार म्हणाले की, छत्रपती कारखाना हार्वेस्टर मशीन घेण्यासाठी शेतकऱ्यांना २५ लाख रुपये बिनव्याजी देत आहे. त्यामुळे ऊस वाहतूकदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा. एआय तंत्रज्ञानामुळे बारामती तालुक्यातील हजार शेतकऱ्यांचे ३५ ते ४० टन उसाचे उत्पादन (production)वाढले असून खत, पाणी व औषधांची मोठी बचत होत आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, एआय हे नवे तंत्रज्ञान असले तरी शेतकऱ्यांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे. लवकरच ठिबक सिंचनचे अनुदान शेतकऱ्यांना मिळेल. राजेंद्र पवार आणि कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी देखील एआयच्या वापरामुळे मिळणाऱ्या फायद्यांवर भर दिला.

यावेळी अजित पवार यांनी छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस बाहेर न जाण्याचा इशारा देत माळेगावप्रमाणेच ऊसाला योग्य भाव देण्याची ग्वाही दिली. तसेच, कारखान्याच्या परिसरातील रस्त्यांसाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपये आणि पुढील टप्प्यात आणखी १०-१५ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा त्यांनी केली.
त्याचबरोबर, डोर्लेवाडी शाळेच्या जागेचा प्रश्न सोडवून रयत शिक्षण संस्थेसाठी ४ कोटी रुपयांची नवीन वास्तू उभी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
हेही वाचा :
हायकोर्टजवळ सुसाट कार दुभाजकावर धडकून अपघात
पृथ्वी शॉ सोबत दिसलेली ‘मिस्ट्री गर्ल’ कोण आहे
तीन महिन्यानंतर RCB च्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट