दर दिवशी गुन्हेगारी जगतामध्ये काही अशी प्रकरणं समोर येतात जी पोलीस यंत्रणांनासुद्धा चक्रावून सोडतात. अशाच एका प्रकरणानं पुन्हा एकदा साऱ्यांना हैराण केलं असून, हे प्रकरण आहे, ‘पिंक गँग’चं. ही एक मुलींची(girls) टोळी असून या 16 मुलींनी फोन कॉलच्या माध्यमातून केलेलं काम अनेकांच्याच भुवया उंचावून जात आहे.

उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडे असणाऱ्या मुजफ्फरनगर इथं मंगळवारी पोलिसांनी एका कॉल सेंटवर धाड टाकत 16 मुलींना ताब्यात घेतलं. बेरोजगार तरुणांना निशाण्यावर घेत, त्यांना नोकरीचं आमिष दाखवूवन या मुली त्यांना आपल्या जाळ्यात ओढत. यानंतर त्याच मुलांची फसवणूक करून त्यांच्याकडून लाखो रुपयांची लूट करत.

आपात्कालीन दूरध्वनी क्रमांकावर पोलिसांना या कॉलटसेंटरसंदर्भातील माहिती मिळाली आणि तातडीनं त्यांनी धाड टाकण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या. ज्यानंतर पोलिसांना घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणं सापडली. दरम्यान या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुलींसोबतच(girls) दोन पुरुषांनासुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

आहद आणि जुबैद असं अटक करण्यात आलेल्या पुरुषांचं नाव असून, मुलींच्या टोळक्यामागे या दोघांचच डोकं असल्याची माहिती समोर येत आहे. ही टोळी नोकरी देण्याच्या नावावर बेरोजगार तरुणांची लूट करत होती. या मुलांची फसवणूक करण्यासाठी मुलींना पगारही दिला जात होता. बेरोजगार तरुणांना फोन करणं आणि त्यांना तगड्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवत या जाळ्या अडकवणं हेच काम या मुली तरत होत्या. पोलिसांना जेव्हा या संपूर्ण घटनेचा सुगावा लागला तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाड टाकली असता तिथून 16 मुलींना अटक करण्यात आली.

बेरोजगार तरुणांचा दूरध्वनी क्रमांक मिळाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधत या तरुणी त्यांच्यापुढं आकर्षक पगाराच्या नोकरीचा प्रस्ताव ठेवत आणि त्यानंतर ‘सिक्योरिटी मनी’ म्हणजेच Advance रक्कम मागत. ही रक्कम साधारण 2500 ते 5000 रुपयांच्या किंवा त्याहून अधिकही असे. ही रक्कम मिळताच नोकरीबाबतचा चकार शब्दसुद्धा काढला जात नसे. कोणतीही तक्रार करण्यासाठी तरुणांनी याच क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन लागत नसे. कारण या मुलींकडून(girls) तरुणांचे मोबाईल क्रमांक ब्लॉक केले जात.

मुजफ्फरनगरचे एसपी सिटी सत्यनारायण प्रजापत यांनी दिलेल्या माहितीसंदर्भात 1930 या पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ज्यानंतरच्या धाडसत्रामध्ये 20 मोबाईल, 30 सिमकार्ड, महत्त्वाचे कागदपत्र आणि काही नोंदी सापडल्या.

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार पुणे आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागांतील तरुणांना या पिंक गँगनं आपल्या जाळ्यात खेचलं होतं. जिथं दर महिन्याला 30 ते 40 हजार फोन कॉल केले जात आणि या माध्यमातून असंख्य तरुणांची फसवणूक करण्यात आली होती. सध्या पोलीस या प्रकरणाची पाळंमुळं नेमकी कुठवर गेली आहेत, याचाच शोध घेत आहेत.

हेही वाचा :

सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री

ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?

रस्त्यावरच अंघोळी अन् तिथेच आराम… Maratha Reservation Morcha चे Video Viral

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *