‘साउंड सिस्टीममध्ये ‘प्रेशर मीड’ या तंत्राचा वापर करून आवाज (sound)मर्यादा वाढविण्याचे प्रकार काही डीजे ऑपरेटर करीत आहेत. भाविकांच्या आरोग्याला घातक अशा कार्बनडाय ऑक्साईड वायूचा वापरही मिरवणुकीत धूर, कागद उधळण्यासाठी होत आहे. हे प्रकार मानवी आरोग्याला अत्यंत घातक असून, असे प्रकार करणाऱ्यांवर थेट कारवाई करून साहित्य जागेवरच जप्त करणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिला.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने शहरातील प्रमुख मंडळांचे पदाधिकारी, साउंड सिस्टीम मालक, ऑपरेटर यांची बैठक आज पोलिस मुख्यालयात झाली. आगमन मिरवणुकीत मंडळांकडून आवाज मर्यादेचे उल्लंघन झाल्याने अशा ३५० हून अधिक मंडळांवर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी नियमांचे पालन करावे; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या.
विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवरच जावे…
‘सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन नदी, तलाव, विहिरीत करण्याचा अट्टहास कोणीही करू नये. महापालिकेने बनवलेल्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जन करावे,’ (sound)असे आवाहनही पोलिस अधीक्षकांनी मंडळानी केले.
ट्रॅक्टरवर नाचणाऱ्यांवर गुन्हे
ट्रॅक्टरच्या बेसवर उभा राहून नाचणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून अश्लील हावभाव, खुन्नस देण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे अशा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

साउंड सिस्टीममुळे कानाचे पडदे फाटणे किंवा बहिरेपणा येण्याची दाट शक्यता असते. हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा कायमस्वरूपी त्रास होऊ शकतो. काही मंडळांकडून कार्बनडाय ऑक्साईडचा वापर होत असून, त्याचेही घातक परिणाम कार्यकर्ते, भाविकांना भोगावे लागणार आहेत,(sound) असे स्पष्ट करण्यात आले.बैठकीला शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, गृहपोलिस उपअधीक्षक तानाजी सावंत, निरीक्षक रवींद्र कळमकर, श्रीराम कन्हेरकर, संजीव झाडे, सुशांत चव्हाण, संतोष डोके, भाजपाचे महेश जाधव, गायत्री राऊत, पिंटू काटकर यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी, साउंड ऑपरेटर उपस्थित होते.
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री
ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?
रस्त्यावरच अंघोळी अन् तिथेच आराम… Maratha Reservation Morcha चे Video Viral