शहापूर पोलिस ठाण्यासमोरच आज रात्री यंत्रमाग कारखान्याच्या प्रवेशद्वारात किरकोळ (Angry)वादातून कामगाराचा निर्घृण खून झाला. लोखंडी हत्याराने डोक्यात व तोंडावर सपासप वार झाल्याने संतोष गोपाल पांडा वय ३८, रा. मूळ ओडिशा, सध्या विनायक हायस्कूलसमोर, शहापूर याचा जागेवरच मृत्यू झाला. तिघे हल्लेखोर ताब्यात घेतले असून दोन ते तीन परप्रांतीय संशयित कामगार पसार झाले असून, शहापूर पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत. आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या प्रवेशद्वारात हा प्रकार घडला.

घटनास्थळावरून आयजीएम रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी, मृत कामगार संतोष पांडा व संशयित हल्लेखोर एकाच यंत्रमाग कारखान्यात काम करतात. काही दिवसांपासून काम करण्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. बुधवारी ता. २७ रात्री त्यांच्यात झालेल्या वादावर पडदा पडल्यानंतर आज पुन्हा वाद उफाळून आला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारखान्यात सगळे मोठमोठ्याने भांडण करू लागले. वाद घालत सगळे कारखान्याबाहेर गेले. यावेळी वाद अधिकच चिघळत गेला आणि संशयित कामगारांनी अचानक लोखंडी हत्यार उचलून संतोष पांडा याच्यावर तुटून पडले.
डोक्यावर तसेच तोंडावर सपासप वार करत त्याला रक्तबंबाळ केले. (Angry)गंभीर जखमी अवस्थेत इतर कामगारांनी संतोष पांडा याला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. संशयित चार ते पाच परप्रांतीय कामगार हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर पोलिस ठाण्याचे पथक त्यांचा शोध घेत आहेत.

संतोष पांडा यांनी स्वतःच्या मध्यस्थीने संशयित परप्रांतीय कामगारांना कारखान्यात कामाला घेतले होते. मात्र, कामचुकारपणामुळे पांडा वारंवार रागावत असत. या कारणावरून सुरू झालेल्या वादाला अखेर उग्र वळण लागले आणि संशयितांनी धारदार हत्याराने पांडा यांचा काटा काढत निर्घृण खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले.(Angry)
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री
ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?
रस्त्यावरच अंघोळी अन् तिथेच आराम… Maratha Reservation Morcha चे Video Viral