सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. गेल्या काही काळात भटक्या कुत्र्यांच्या(Dog) संदर्भात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एककीडे भटक्या कुत्र्यांचा लोकांवर हल्ला करतानाचे व्हिडिओ तर दुसरीकडे कुत्र्यांना मारतानाचे माणसांचे निर्दयी व्हिडिओ पाहायला मिळत आहे. असे म्हणतात एखादा प्राणी शांत बसला असेल तर त्याची छेड काढू नये. नाहीतर ते तुमच्याच आंगलट येण्याची शक्यता आहे. त्या मुक्या जनावराला माणसाप्रमाणे तो काय करत आहे याची कल्पना नसते.

पण मानव हा प्राणी असा आहे ज्याल्या त्याच्या कृत्याची कल्पना असते. त्याला तो चूकीचे कृत्य करत आहे हेही माहित असते मात्र तरीही सुधारण्याचे नाव घेत नाही. सध्या एक माणुसकीवर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कुत्र्याने व्यक्तीवर केवळ भुंकल्याने त्याला असहाय्य वेदना सहन कराव्या लागल्या आहेत.

एका व्यक्तीने कुत्रा(Dog) त्याच्यावर भूंकल्याच्या कारणावरुन त्याच्या पायाला दोरी बांधली आणि ती दोरी गाडीला बांधून फरपटत नेलं आहे. त्याने कुत्र्याला संपूर्ण गावभर फिरवले असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये त्या कुत्र्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या निर्दयी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ही घटना नाशिकमध्ये घडली असल्याची माहिती मिळाली आहे. पण यामुळे सोशल मीडियावर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @kumbharnc57 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी माणूसकी मरत चालली असल्याचे म्हटले आहे. प्राणीप्रेमींनी देखील संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे. यापूर्वी देखील कुत्र्याला, उंटाला, बेदम मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा :

अरुण गवळी १८ वर्षांनंतर कारागृहाबाहेर…..

125 वर्षांपूर्वी जग कसं होतं? कल्पनेपलीकडचा दुर्मिळ व्हिडिओ

जरांग्या तू कोण आहेस? आई-बहिणीवरुन… गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीचे शब्द

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *