अमेरिकेने ज्याप्रकारे भारतावर टॅरिफ लावला, त्यानंतर खळबळ उडाली.(market)डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासमोर काही अटी ठेवल्या आहेत. हेच नाही तर जोपर्यंत टॅरिफचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत भारतासोबतच कोणत्याही प्रकारची व्यापार चर्चा होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. रशियाकडून भारत कच्चे तेल खरेदी करत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पटत नाहीये. मात्र, दुसरीकडे भारताचे शेजारी देश चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशाबद्दल अमेरिकेची टॅरिफबद्दलची भूमिका वेगळी आहे. 90 दिवसांनी चीनच्या टॅरिफबद्दल विचार केला जाणार आहे आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशावर टॅरिफ खूप कमी आहे, यामुळे अमेरिकेची दुटप्पी भूमिका दिसतंय.

हेच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात मोठे बदल होण्याचे थेट संकेत आहेत. भारत आता युरोपियन युनियन आणि आसियान सारख्या बाजारपेठेत पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहेत. कारण टॅरिफचे नुकसान तिकडून भरून काढले जाऊ शकते आणि हा अमेरिकेला मोठा धक्काच मानला जातोय.(market) यासोबतच अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांबाबतही भारत लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भारताच्या या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडू शकते.
भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाहीये. आता याबद्दलच एशिया इंस्टीट्यूटचे संचालक मायकेल कुगेलमन यांनी भाष्य केलंय. त्यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प हे रशियाकडून कच्चे तेल खरेदी कमी करण्यावर दबाव टाकत आहे. भारताला या टॅरिफला उत्तर द्यावे लागणार आहे. भारताने आपली भूमिका स्पष्ट ठेवावी आणि काहीही झाले तरीही अमेरिकेसमोर गुडघे टेकू नये. भारताच्या आजुबाजूचे देश, बांगलादेश, पाकिस्तान यांना भारताच्या तुलनेत फार कमी टॅरिफ आहे जर भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या तर या टॅरिफमुळे भारताचे मोठे नुकसान होऊ शकते आणि मला विश्वास आहे की, भारत अमेरिके पुढे झुकणार नाही. पण काहीही झाले तरीही भारताला टॅरिफला उत्तर द्यावे लागणार आहे. युरोपियन युनियन आणि आसियान सारख्या बाजारपेठांसोबत भारताने मुक्त व्यापार करार वेगाने पुढे नेऊन या कर संकटाचे उत्तर दिले पाहिजे आणि त्यांचे नुकसानही भरून काढले पाहिजे.

भारत या टॅरिफवर समाधानकारक पर्याय शोधेल आणि त्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करेल आणि त्यांनी पर्यायी व्यापारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल जी भूमिका घेतली आहे, (market)त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे दिसतंय. या वाईट काळात अनेक देश हे भारताच्यासोबत असल्याचेही बघायला मिळाले. आता पुढील काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा :
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बेस्ट वीज विभागाचा सर्वात मोठा निर्णय
एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
डे-केअरमध्ये 15 महिन्याच्या मुलीचा गळा दाबणे, तोंडात पेन्सिल घालणे, शरीरावर चावा घेण्याचा घडला भयंकर प्रकार