सोमवारी सकाळी ट्रान्सजेंडर आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत (transgender)गुरूग्राममध्ये मोठा गोंधळ उडाला.यादरम्यान, संतप्त तृतीयपंथीयांनी पोलिसांच्या ११२ वाहनाची तोडफोड केली. या झटापटीत काही तृतीयपंथीयांचे कपडे फाटले. ट्रान्सजेंडरच्या एका गटाने डीएलएफ फेज – २ पोलीस स्टेशनबाहेर जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

या आंदोलनाचे नेतृत्व शगुन नावाच्या एका तृतीयपंथीयाने केलं होतं. या ट्रान्सजेंडरनं पोलिसांवर मारहाण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शगुन आणि तिची मैत्रिणी सोनाली, शिवी आणि रिया एमजी रोड मेट्रो स्टेशनजवळ उभ्या होत्या. त्या ठिकाणी पोलीस आले. त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न केला.(transgender) शगुनचा आरोप आहे की, पोलिसांनी त्यांच्यावर चुकीचे काम करण्यासाठी दबाव आणला.जेव्हा त्यांनी विरोध केला तेव्हा पोलिसांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये नेलं. रात्रीच्या वेळेस एकही महिला पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित नव्हते. सुमारे १२ पोलिसांनी ३ तृतियपंथियांना बेदम मारहाण केली, असा शगुनने आरोप केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी शगुनच्या आठ साथीदारांना विनाकारण पोलीस ठाण्यात बंद केले आणि त्यांना पाणी सुद्धा दिले नाही, असा आरोपही शगुननं केला. उपस्थित असलेल्या एका तृतीयपंथीयानं असाही दावा केला की, पोलिसांनी यापूर्वीही त्यांच्यासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले होते.तृतीयपंथीयांनी केलेल्या आरोपानंतर पोलीस प्रवक्ते संदीप कुमार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. ‘तृतीयपंथीयांनी केलेले आरोप सगळे निराधार आहेत. (transgender)पोलीस पथक एमजी रोडवरून तृतीयपंथीयांना हटवत होते. कारण ते तिथे उभे होते. यादरम्यान, काही तृतीयपंथीयांनी पोलिसांवर हल्ला केला. तसेच लैंगिक संबंध ठेवण्यासाठी केलेली मागणी देखील पूर्णपणे खोटी आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, ८ तृतीयपंथीयांना ताब्यात घेतलं आहे’, असं पोलीस म्हणाले.
हेही वाचा :
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बेस्ट वीज विभागाचा सर्वात मोठा निर्णय
एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
डे-केअरमध्ये 15 महिन्याच्या मुलीचा गळा दाबणे, तोंडात पेन्सिल घालणे, शरीरावर चावा घेण्याचा घडला भयंकर प्रकार