पंड्या ब्रदर्समधली फूट चव्हाट्यावर ? ना हँडशेक, आऊट झाल्यावर आक्रमक सेलिब्रेशन, हार्दिक-कृणालचं काय बिनसलं ?

भारतीय क्रिकेटमधील प्रसिद्ध (brothers)पंड्या ब्रदर्स म्हणजेच हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यात सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. मैदानावर घडलेल्या काही घटनांमुळे या दोघांमधील नात्यात तणाव निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अलीकडील सामन्यात हार्दिक (brothers)आणि कृणाल यांच्यातील संवाद पूर्णपणे कमी झाल्याचं पाहायला मिळालं. एका प्रसंगात विकेट पडल्यानंतर हार्दिकने केलेलं आक्रमक सेलिब्रेशन आणि त्यावेळी कृणालकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे, सामन्यानंतरही दोघांनी एकमेकांशी हँडशेक न केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं, ज्यामुळे या वादाला अधिक हवा मिळाली.दोघे भाऊ मैदानावर नेहमीच एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात, मात्र यावेळी दिसलेलं अंतर चाहत्यांसाठी धक्कादायक ठरलं आहे.

सोशल मीडियावरही याबाबत (brothers)विविध तर्कवितर्क लावले जात असून, त्यांच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक मतभेदांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.तथापि, या सर्व चर्चांवर अद्याप हार्दिक किंवा कृणाल यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे ही केवळ सामन्यातील तात्पुरती परिस्थिती होती की खरोखरच काही बिनसलं आहे, याबाबत स्पष्टता येणं बाकी आहे. मात्र, पंड्या ब्रदर्समधील या कथित दुराव्यामुळे क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.