आयफोन वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.(announced) Truecaller या लोकप्रिय अॅपने जाहीर केलं आहे की, 30 सप्टेंबर 2025 पासून iPhone वर कॉल रेकॉर्डिंग फीचर बंद होणार आहे. त्यामुळे या फीचरवर अवलंबून असणाऱ्या युजर्सना आपला डेटा वेळीच सेव्ह करून घ्यावा लागणार आहे.Truecallerने सांगितले आहे की, Apple ने त्यांच्या iOS च्या नवीन व्हर्जनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर सादर केल्यामुळे आता थर्ड-पार्टी अॅप्सची गरज उरणार नाही. त्यामुळे कंपनीने iPhone यूझर्ससाठी कॉल रेकॉर्डिंग सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

iOS प्लॅटफॉर्मवर Androidच्या तुलनेत कॉल रेकॉर्डिंग अधिक कठीण आणि महागडं असतं. Truecallerला कॉलमध्ये एक स्पेशल रेकॉर्डिंग लाइन विलीन करावी लागते, जी तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीची आणि खर्चिक प्रक्रिया आहे.(announced) याच कारणामुळे आता Truecaller हे फीचर थांबवत असून, लाइव्ह कॉलर आयडी व स्पॅम ब्लॉकिंग यांसारख्या इतर फिचर्सवर लक्ष केंद्रीत करणार आहे.Truecallerने युजर्सना 30 सप्टेंबरपूर्वी कॉल रेकॉर्डिंगचा बॅकअप घ्यावा, (announced) असं आवाहन केलं आहे. अन्यथा त्यानंतर सर्व रेकॉर्डिंग्स कायमस्वरूपी डिलीट करण्यात येतील.

डेटा सेव्ह करण्याची प्रक्रिया:
– Truecaller अॅप उघडा.
– “Record” टॅबमध्ये जा.
– वरच्या बाजूला असलेल्या “Settings” वर टॅप करा.
– “Storage Preference” iCloud वर सेट करा.
– विशिष्ट रेकॉर्डिंग सेव्ह करायचे असल्यास, त्या फाइलवर डावीकडे स्वाइप करून “Share” किंवा “Export” टॅप करा.
हेही वाचा :
नवीन आयकर विधेयकात काय काय बदललं? ७ नियमांमध्ये झाला मोठा बदल
अंगात 4 भुतं, 11 वेळा संभोग कर, अन्यथा नवरा मरेल अंध तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
उद्यापासून सुरू होतोय फ्लिपकार्टचा Independence Day Sale; खरेदीवर मिळणार 50% पर्यंत बंपर डिस्काउंट