बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेले कपल ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या (divorce)अफवांनी काही महिन्यांपूर्वी जोर धरला होता. मात्र आता प्रसिद्ध जाहिरात दिग्दर्शक प्रल्हाद कक्कड यांनी या चर्चांवर मौन तोडत सत्य उघड केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की ऐश्वर्या बच्चन कुटुंब सोडून गेली नसून, आईच्या प्रकृतीमुळे ती वारंवार आईच्या घरी जाते.

प्रल्हाद कक्कड यांनी सांगितले की, ऐश्वर्या मॉडेलिंगच्या दिवसांपासून त्यांना ओळखीची आहे. लग्नानंतरही ऐश्वर्या आईच्या घरातून थेट दुसऱ्या घरात राहायला गेली नाही. तिच्या आईची तब्येत ठीक नसल्याने ती रोज सकाळी मुलगी आराध्याला शाळेत सोडल्यानंतर आईला भेटण्यासाठी तिच्या घरी जाते आणि संध्याकाळी पुन्हा घरी परतते.
जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यातील मतभेदांबद्दल विचारले असता प्रल्हाद कक्कड यांनी सांगितले, “यात काही मोठे नाही. ऐश्वर्या अजूनही बच्चन घराची सून आहे आणि घर सांभाळते. फक्त आईच्या प्रकृतीमुळे ती वेळ काढून तिच्या आईला भेटते.”
यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या(divorce) चर्चांना पूर्णविराम लागला असून, ही अफवा फक्त गैरसमज असल्याचे प्रल्हाद कक्कड यांनी स्पष्ट केले आहे. ऐश्वर्या नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहते, मात्र या वेळी तिच्या आईसाठी ती घेत असलेल्या जबाबदारीवर प्रकाश टाकला गेला आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी..आणखी १७५०० महिलांचे अर्ज…
परीक्षा न देताच रेल्वेत मिळवा जॉब, डिटेल्स एका क्लिकवर..
कपिल शर्मा शो’मध्ये ‘हेराफेरी’च्या बाबुरावला दाखवणं पडलं भारी